Border-Gavaskar Trophy : वादग्रस्त निर्णयाने राहुल आऊट

भारताचा फलंदाज केएल राहुलला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. २३व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. स्टार्कचा चेंडू राहुलच्या बॅटजवळून गेला आणि यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भारताचा फलंदाज केएल राहुलला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. २३व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. स्टार्कचा चेंडू राहुलच्या बॅटजवळून गेला आणि यष्टीरक्षक ॲलेक्स कॅरीच्या ग्लोव्ह्जमध्ये विसावला. ऑस्ट्रेलियन संघाने झेलबादचे अपील केले. मात्र मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये असे दिसून आले की राहुलच्या बॅटने त्याच्या पॅडला स्पर्श केला, ज्याचा आवाज अल्ट्रा-एजमध्ये दिसत होता.

तिसऱ्या पंचाने दुसरा ॲंगल पाहण्याची मागणी केली. पण ब्रॉडकास्टिंग टीमकडे दुसरा ॲंगल उपलब्ध नव्हता. अशा परिस्थितीत मैदानी पंचाचा निर्णय रद्द करण्यासाठी टीव्ही पंचांकडे निर्णायक पुरावा नव्हता. असे असतानाही पंचांनी निर्णय फिरवला आणि राहुलला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

राहुलच्या या निर्णयानंतर अनेक दिग्गजांनी या निर्णयावर टीका केली. ऑस्ट्रेलियाचे मॅथ्यू हेडन आणि इंग्लंडचे मार्क निकोल्स म्हणाले की, ‘‘हा निर्णय रद्द करण्यासाठी पुरेसा कॅमेरा अँगल नव्हता. हे पाहता राहुलला बाद ठरवणे अयोग्य आहे. ’’ भारताचे सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर यांनीही हा निर्णय चुकीचा असल्याचे नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story