रिंकूने मोडला मिलर, धोनीचा विक्रम

रिंकू सिंगने अविश्वसनीय खेळी करताना अखेरच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार लगावत कोलकाता नाईट रायडर्सला थरारक विजय मिळवून दिला. याबरोबरच २५ वर्षीय डावखुऱ्या रिंकूने डेव्हीड मिलर, महेंद्रसिंह धोनी यांच्यासारख्या ग्रेट फिनिशरचे विक्रम मोडून आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा नवा विक्रम आपल्या नावे केला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 10 Apr 2023
  • 03:37 pm
रिंकूने मोडला मिलर, धोनीचा विक्रम

रिंकूने मोडला मिलर, धोनीचा विक्रम

#अहमदाबाद

रिंकू सिंगने अविश्वसनीय खेळी करताना अखेरच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार लगावत  कोलकाता नाईट रायडर्सला थरारक विजय मिळवून दिला. याबरोबरच २५ वर्षीय डावखुऱ्या रिंकूने डेव्हीड मिलर, महेंद्रसिंह धोनी यांच्यासारख्या ग्रेट फिनिशरचे विक्रम मोडून आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा नवा विक्रम आपल्या नावे केला.

शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून संघाला विजय मिळवून देणाऱ्यांमध्ये रिंकू पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये एकाही खेळाडूने शेवटच्या षटकात पाच षटकार मारून सामना जिंकला नव्हता. रविवारी ठोकलेल्या सलग पाच षटकारांच्या जोरावर रिंकू या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. यापूर्वी मागील वर्षी  डेविड मिलर आणि राशिद खान यांनी शेवटच्या षटकात प्रत्येकी ३ षटकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. २०२० मध्ये अक्षर पटेलनेही ही कामगिरी केली होती. २०१६ मध्ये धोनीनेही शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकत चेन्नईला विजय मिळवून दिला होता. रिंकूने या सर्वांना मागे टाकले.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest