पराभवाचे खापर रियान परागवर!

Lucknow Super Giants defeated Rajasthan Royals by just 10 runs in a thrilling encounter at the Sawai Mansingh Stadium, Jaipur on Wednesday (April 19). Batting first, Lucknow set a target of 155 runs. Initially, it looked like Rajasthan would win the match easily, but their last batsman Riyan Parag failed. Therefore, Rian Parag is being trolled by complaining about his defeat.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Fri, 21 Apr 2023
  • 02:48 am
पराभवाचे खापर रियान परागवर!

पराभवाचे खापर रियान परागवर!

राजस्थान रॉयल्सच्या सलामीच्या फलंदाजांनी केली निराशा; फिनिशर परागची बॅट तळपली नाही

#जयपूर

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी (१९ एप्रिल) झालेल्या रोमहर्षक लढतीत लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सचा फक्त १० धावांनी पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीला राजस्थान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण त्यांचा शेवटचा फलंदाज रियान पराग अपयशी ठरला. त्यामुळे पराभवाचे खापर फोडत रियान परागला ट्रोल केले जात आहे.

या  सामन्यात रियान पराग १६ व्या षटकात फलंदाजीला आला. तो फिनिशर म्हणून खेळत होता. अशा स्थितीत त्याच्याकडून शेवटी वेगवान धावा करून सामना संपवणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. त्याने १२ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १५ धावा केल्या. याचाच अर्थ उरलेल्या १० चेंडूत त्याने केवळ ५ धावा केल्या आणि त्यामुळेच त्याच्यावर टीका होत आहे.

रियान परागचा फॉर्म हरवला आहे. ज्यो रूटसारखे बडे खेळाडू संघात असताना रियानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आल्यामुळे त्याच्यावर बरीच टीका होत आहे. रियान परागबद्दल सोशल मीडियावर फनी मीम्स शेअर केले जात आहेत. खरं तर, राजस्थानला ३० चेंडूत ५१ धावांची गरज होती. त्यावेळी देवदत्त पडिक्कल आणि रियान पराग मैदानात होते. दोघांकडून वेगवान धावांची अपेक्षा होती, पण दोघांनीही निराश केले. पडिक्कलने २१ चेंडूत २६ तर परागने १२ चेंडूत १५ धावा केल्या. राजस्थान संघ परागला एका सत्रासाठी ३.८० कोटी रुपये देत आहे.

दरम्यान रियानने या मोसमात ५ सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने ५४ धावा केल्या आहेत, तर सर्वोत्तम धावसंख्या २० धावा आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ७, पंजाबविरुद्ध २०, दिल्लीविरुद्ध ७, गुजरातविरुद्ध ५ आणि लखनौविरुद्ध नाबाद १५ धावा केल्या, पण आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दुर्दैवाने तीन षटकांत तीन विकेट गमावल्या पण तरीही आम्ही लक्ष्य गाठू शकलो असतो. शेवटच्या षटकात, विशेषतः रवी विश्नोईच्या शेवटच्या षटकात, आम्ही गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी साधली नाही.  त्यानंतरही एखादा फलंदाज बाद झाला तरी काही फरक पडला नसता. चेंडू जुना झाल्यावर या विकेटवर फलंदाजी करणे सोपे नव्हते, पण त्याने चांगली गोलंदाजी केल्याचे सांगत राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकाराने रियानची पाठराखण केली आहे.

वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story