राजस्थानची दिल्लीवर यशस्वी स्वारी!

फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही केलेल्या अचूक कामगिरीमुळे आयपीएल-१६ मध्ये राजस्थान राॅयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी धुव्वा उडवला. अवघ्या ३१ चेंडूंत ६० धावांची वादळी खेळी करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दिल्लीचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 9 Apr 2023
  • 02:47 am
राजस्थानची दिल्लीवर यशस्वी स्वारी!

राजस्थानची दिल्लीवर यशस्वी स्वारी!

राॅयल्सचा ५७ धावांनी मोठा विजय, कॅपिटल्सच्या पराभवाची हॅट‌्ट्रिक

#गुवाहाटी

फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनीही केलेल्या अचूक कामगिरीमुळे आयपीएल-१६ मध्ये राजस्थान राॅयल्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५७ धावांनी धुव्वा उडवला. अवघ्या ३१ चेंडूंत ६० धावांची वादळी खेळी करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दिल्लीचा या स्पर्धेतील हा सलग तिसरा पराभव ठरला.

दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने गुवाहाटीच्या मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. युवा यशस्वी आणि अनुभवी जाेस बटलर यांनी दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली. यशस्वीने आपल्या खेळीत एक षटकार आणि ११ चौकार लगावले. बटलरनेही एक षटकार आणि ११ चौकारांसह ५१ चेंडूंत ७९ धावा चोपून काढल्या. अखेरच्या षटकांत शिमराॅह हेटमायरने २१ चेंडूंत नाबाद ३९ धावा करताना ४ षटकार आणि एक चौकार लगावला.  या जोरावर राजस्थानने ४ बाद १९९ अशी भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, राजस्थानच्या वेगवान आणि फरकी गोलंदाजांनी कमालीचा अचूक मारा करीत दिल्लीच्या संघाला २० षटकांत ९ बाद १४२ धावांवर रोखले. कर्धधार डेव्हिड वाॅर्नरने या संघातर्फे सर्वाधिक ६५ धावा (५५ चेंडूंत ७ चौकार) केल्या. मात्र, दिल्लीला विजयासाठी अपेक्षित वेगाने पाठलाग करणे त्यालाही शक्य झाले नाही. फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३ बळी घेत दिल्लीचे कंबरडे मोडले. रवीचंद्रन अश्विनने २ तर संदीप शर्माने एक बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.

सामन्याच्या प्रारंभी यशस्वी-बटलर जोडीने ५१ चेंडूंत ९८ धावांची सलामी देत दिल्लीच्या माऱ्यातील हवाच काढून घेतली. या दोघांत यशस्वी अधिक आक्रमक होता.  कर्णधार संजू सॅमसन मात्र साफ अपयशी ठरला. चार चेंडूंचा सामना करूनदेखील त्याला भोपळा फोडता आला नाही. रियान परागही (११ चेंडूंत ७ धावा) अपयशी ठरला. दिल्लीतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरलेल्या मुकेशकुमारने यशस्वी आणि बटलर यांना बाद केले.

विजयासाठी २०० धावांचे आव्हान दिल्लीला अजिबातही पेलवले नाही. या संघातर्फे वाॅर्नर (६५), ललित यादव (२४ चेंडूंत ३८), आणि रिली रुसो (१२ चेंडूंत १४) यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. वाॅर्नर आणि यादव यांच्यात चौथ्या गड्याासाठी झालेली ६४ धावांची भागिदारी दिल्लीच्या डावात सर्वोच्च ठरली.वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest