Cricket Tournament : दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डीव्हीसीए, पूना क्लब संघांचा सलग दुसरा विजय

पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक (Cricket Tournament) आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना (Hindu Gymkhana), पूना क्लब (Puna Club), दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Avinash Rajput
  • Fri, 27 Oct 2023
  • 04:43 pm
Cricket Tournament : दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डीव्हीसीए, पूना क्लब संघांचा सलग दुसरा विजय

दोशी इंजिनिअर्स करंडक आंतरक्लब वरिष्ठ क्रिकेट स्पर्धेत पीवायसी हिंदू जिमखाना, डीव्हीसीए, पूना क्लब संघांचा सलग दुसरा विजय

पुणे : पाथ-वे फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित व एमसीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दोशी इंजिनिअर्स करंडक (Cricket Tournament) आंतरक्लब वरिष्ठ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत पीवायसी हिंदू जिमखाना (Hindu Gymkhana), पूना क्लब (Puna Club), दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी मैदानावरील लढतीत दिव्यांग हिंगणेकर(126धावा)याने केलेल्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आर्यन्स क्रिकेट क्लबचा 102 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पीवायसी हिंदू जिमखाना संघाने  50 षटकात 6बाद 331धावा केल्या. यात दिव्यांग हिंगणेकरने 141चेंडूत 8चौकार व 6 षटकाराच्या मदतीने 126 धावा केल्या. त्याला श्रेयश वाळेकर(65धावा)काढून साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी  १८३ चेंडूत १४८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर दिव्यांगने राहुल देसाई(नाबाद 77धावा)च्या साथीत ३९ चेंडूत ५९ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. आर्यन्सकडून आनंद ठेंगे(3-69), तनय संघवी(1-63) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात आर्यन्स क्रिकेट क्लबचा डाव 42.5 षटकात सर्वबाद 229धावावर आटोपला. यात यशराज खाडे 59, पुरंजय सिंग राठोड 44, अभिषेक ताटे 30, तनय संघवी नाबाद 27, आनंद ठेंगे 23, अक्षय काळोखे 22 यांनी धावा केल्या. पीवायसीकडून आदित्य डावरे(4-48), रोहन दामले(3-47), गुरवीर सिंग सैनी(2-43) यांनी अचूक गोलंदाजी केली. सामनावीर दिव्यांग हिंगणेकर ठरला.

पूना क्लब मैदानावरील लढतीत यश नाहर(110धावा व 2-8)याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर पूना क्लब संघाने केडन्सचा 92 धावांनी  पराभव करून आपली विजयी मलिका कायम राखली. डीव्हीसीए मैदानावरील विनय पाटील(105धावा)याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने डेक्कन जिमखानाचा 148 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. बारणे क्रिकेट मैदानावरील सामन्यात ऋषभ कारवा(3-26) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अँबिशियस क्रिकेट क्लबने ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीचा 8 गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला.

 

सविस्तर निकाल: साखळी फेरी:

बारणे अकादमी मैदान:

ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी : 35.1 षटकात सर्वबाद 167धावा(रोहित खरात 39(65,5x4), प्रज्योत हरळीकर 21, उत्कर्ष चौधरी 19, ऋषभ कारवा 3-26, वैभव विभूते 3-32, आकाश तनपुरे 2-22, सिद्धांत दोषी 2-26)पराभुत वि.अँबिशियस क्रिकेट क्लब: 29.3 षटकात 3बाद 172धावा(ऋषिकेश बारणे नाबाद 55(67,8x4), हर्षल हाडके नाबाद 36(44,1x4,2x6), अभिनव भट्ट 37(41,8x4), सार्थक वाळके 2-27);सामनावीर-ऋषभ कारवा;  अँबिशियस संघ 8 गडी राखून विजयी;

पूना क्लब मैदान:

पूना क्लब: 50 षटकात 9बाद 295धावा(यश नाहर 110(99,10x4,5x6), अथर्व काळे 81(92,7x4,4x6), अजिंक्य नाईक 26, अकिब शेख 19, हर्षद खडीवाले 2-26, स्वप्नील गुगळे 2-50 , अक्षय वायकर 2-51)वि.वि.केडन्स: 40.4 षटकात सर्वबाद 203धावा(अनिकेत पोरवाल 37, स्वप्नील गुगळे 25, अरकम सय्यद 25, हर्षद खडीवाले 21, निपुण गायकवाड 16, इझान सय्यद  24,  शुभम कोठारी 3-35, यश नाहर 2-8, अखिलेश गवळे 2-22, सौरभ पवार 1-20)सामनावीर-यश नाहर; पूना क्लब संघ 92 धावांनी विजयी;

पीवायसी मैदान:

पीवायसी हिंदू जिमखाना: 50 षटकात 6बाद 331धावा(दिव्यांग हिंगणेकर 126(141,8x4,6x6), राहुल देसाई नाबाद 77(33,5x4,7x6), श्रेयश वाळेकर 65(84,6x4,1x6), आनंद ठेंगे 3-69 , तनय संघवी 1-63)वि.वि.आर्यन्स क्रिकेट क्लब: 42.5 षटकात सर्वबाद 229धावा(यशराज खाडे 59(73,6x4,1x6), पुरंजय सिंग राठोड 44(44,7x4,1x6), अभिषेक ताटे 30, तनय संघवी नाबाद 27, आनंद ठेंगे 23, अक्षय काळोखे 22, आदित्य डावरे 4-48, रोहन दामले 3-47, गुरवीर सिंग सैनी 2-43)सामनावीर -दिव्यांग हिंगणेकर; पीवायसी संघ 102 धावांनी विजयी;

डीव्हीसीए मैदान:

दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमी:  50 षटकात 4बाद 296धावा(विनय पाटील 105(138,11x4,3x6), ओम भोसले 80(93,7x4,2x6), सौरभ नवले नाबाद 52(28,4x4,3x6), आशय पालकर 2-47, आयुष काबरा 1-35)वि.वि.डेक्कन जिमखाना: 28.4 षटकात सर्वबाद 148धावा(आदर्श बोथरा 23, हर्ष संघवी 29, आशय पालकर 21, सोहम कुमठेकर 28, रोहित चौधरी 3-10, अॅलन रॉड्रिग्ज 2-23, टिळक जाधव 2-37);सामनावीर-विनय पाटील; डीव्हीसीए संघ 148 धावांनी विजयी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest