पुण्याच्या अमोघ अडिगेची भारताच्या 23 वर्षाखालील फुटबॉल संघाच्या विश्लेषकपदी निवड

पुण्यातील गुणवान प्रशिक्षक अमोघ अडिगेची भारताच्या 23 वर्षाखालील फुटबॉल (Football) संघाचे कामगिरी विश्लेषक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने भारतीय संघाबरोबर मलेशियाचा दौरा केला आणि दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघासाठी विश्लेषक म्हणून उत्कृष्ठ कामगिरी बजावली.

Football

पुण्याच्या अमोघ अडिगेची भारताच्या 23 वर्षाखालील फुटबॉल संघाच्या विश्लेषकपदी निवड

पुणे : (Pune) पुण्यातील गुणवान प्रशिक्षक अमोघ अडिगेची भारताच्या 23 वर्षाखालील फुटबॉल (Football) संघाचे कामगिरी विश्लेषक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने भारतीय संघाबरोबर मलेशियाचा दौरा केला आणि दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय संघासाठी विश्लेषक म्हणून उत्कृष्ठ कामगिरी बजावली.

गेल्या पाच वर्षांत पुण्यातून झपाट्याने पुढे आलेला गुणवान फुटबॉल प्रशिक्षक अमोघ अडिगे याने बेंगळूरु एफसी या नामवंत संघासाठी एक वर्ष काम केल्यानंतर त्यांची इंडीयन सुपर लीग मधील नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी या संघासाठी तंत्रज्ञानच्या टीममध्ये निवड झाली असून येथे तो आता उत्कृष्ठ कामगिरी बजावत आहे. 

त्याची सर्वात महत्वाची कामगिरी म्हणजे इंग्लंडमधील यूईएफए - ए आणि एलीट युथ ए या दोन्हीं प्रशिक्षक लायसेन्स कोर्ससाठी त्याला प्रवेश देण्यात आला असून अन्य अभ्यास क्रमाबरोबरच हा कोर्स पूर्ण करण्यासाठी त्याला पुढच्या वर्ष भरात इंग्लंडला त्याला भेट द्यावी लागणार आहे. 

तत्पूर्वी इयत्ता दहावी नंतरच फुटबॉल मध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेणाऱ्या अमोघने त्यासाठी फुटबॉलचे माहेरघर असलेल्या इंग्लंडची निवड केली. इयत्ता बारावी नंतर बीएससी(फुटबॉल कोचिंग अँड परफॉर्मन्स) ही पदवी मिळवून फुटबॉल कारकीर्दीचा त्याने प्रारंभ केला. इंग्लंडमधील विद्यापीठात 2019 या वर्षी क्रिडा विषयात स्टूडेंट ऑफ द इयर पुरस्कार मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. 

त्यानंतर अमोघने इंग्लंडमधील कार्डिफ सिटी, बॅरी टाऊन युनायटेड, ब्रिस्टॉल रोवर्स एफसी आणि न्युपोर्ट काउंटी या व्यावसायिक क्लबसाठी काम करताना फुटबॉल असोसिएशन ऑफ वेल्स यांच्यासाठी प्रशिक्षक आणि विश्लेषक म्हणून काम पाहिले. 

याच दरम्यान अमोघला यूईएफए- बी या दर्जाचे प्रशिक्षक लायसेन्सही मिळाले. तसेच, त्याच काळात त्याने यूईएफए युरो 2020 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी विश्लेषक व अधिकारी म्हणून काम केले. इंग्लंड मध्ये चार वर्षे काम केल्यानंतर अमोघ ला अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे मुख्य प्रशिक्षक पदाची संधी मिळाली व तो करार पुर्ण झाल्यावर भारतातील बेंगळुरू एफसी येथे त्यांच्या निवासी प्रशिक्षण अकादमीत प्रशिक्षक म्हणून त्याने उत्तम कामगिरी बजावली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest