पृथ्वी शॉची आयपीएलमधील पुनरागमनाची शक्यता संपुष्टात

नेटमध्ये कसून सराव करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा दमदार फलंदाज पृथ्वी शॉला सामन्यात मात्र चमकदार कामगिरी करता येत नसल्याने संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यातही त्याला सूर गवसण्याची शक्यता नसल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:55 pm
पृथ्वी शॉची आयपीएलमधील पुनरागमनाची शक्यता संपुष्टात

पृथ्वी शॉची आयपीएलमधील पुनरागमनाची शक्यता संपुष्टात

फॉर्म हरवल्यामुळे संघाबाहेर; प्रशिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी

#मुंबई

नेटमध्ये कसून सराव करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा दमदार फलंदाज पृथ्वी शॉला सामन्यात मात्र चमकदार कामगिरी करता येत नसल्याने संघातून वगळण्यात आले आहे. आयपीएलच्या उर्वरित सामन्यातही त्याला सूर गवसण्याची शक्यता नसल्यामुळे त्याच्या पुनरागमनाची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे.    

नेटमध्ये कसून सराव करणाऱ्या पृथ्वी शॉकडून मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. त्याच्या तुलनेत दुसऱ्या संघातील सलामी फलंदाज अप्रतिम कामगिरी करत असल्याचे लक्षात आल्यावर पॉन्टिंगने त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला.  शॉने सहा सामन्यात खराब प्रदर्शन केल्यानंतर बाहेर ठेवण्यात आले. आता त्याच्या पुनरागमनाची शक्यता नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. पॉन्टिंगने सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी म्हटले की, मागील १२ आयपीएल सामन्यात (२०२२ चे सामने) पृथ्वी शॉने अर्धशतक ठोकलेले नाही. दुसऱ्या संघातील अनेक फलंदाज त्याच्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करत आहेत. या आयपीएलमध्ये शॉने ६ सामन्यात ४७ धावा केल्या आहेत.

फॉर्ममध्ये असल्यावर पृथ्वी मॅच विनर खेळाडू आहे. याच कारणामुळे त्याला संघात ठेवले होते. कारण तो फलंदाजी करताना टिकला तर आम्ही सामना जिंकू शकलो असतो. या हंगामात त्याने चांगली कामगिरी केली नाही. सहा सामन्यांमध्ये जवळपास ४० धावा केल्या आहेत. अशा कामगिरीमुळे संघाला फायदा होणार नाही. त्याला बाहेर ठेवायचा निर्णय कठीण असल्याचेही पॉन्टिंग म्हणाला आहे. परंतु, आम्ही जो संघ निवडला आहे, तो भविष्यातील सामने जिंकेल, अशी आशा आहे. एनसीएमध्ये काही वेळ घालवल्यानंतर तो या वर्षी आयपीएलमध्ये आला. त्याने फिटनेसवर खूप मेहनत घेतली. नेटवर सराव करताना त्याला पाहिल्यावर मला वाटत होते की, हे वर्ष त्याच्यासाठी लाभदायक जाईल, मात्र आतापर्यंत असे झाले नसल्याचेही पॉन्टिंगने नमूद केले आहे. वृत्तसंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest