Japanese Tennis star Naomi Osaka
WTA Auckland Open 2025 (Naomi Osaka) : चार वेळची ग्रँड स्लॅम एकेरी विजेती नाओमी ओसाकाने बुधवारी ज्युलिया ग्रेबरचा (Julia Grabher) 7-5, 6-3 असा पराभव करून ऑकलंड टेनिस क्लासिक (ASBClassic25) स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचून 2025 वर्षाची चांगली सुरुवात केली आहे. तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना शुक्रवारी(3 जानेवारी) खेळवला जाईल.
All smiles into the quarterfinals ☺️
— ASB Classic (@ASB_Classic) January 1, 2025
Naomi Osaka steams past Grabher to book a spot in the last 8!#ASBClassic25 pic.twitter.com/QfvQnFBiti
जोरदार वारा आणि पावसामुळे सामना बराच उशीर झाला असला तरी जपानची आघाडीची टेनिसपटू ओसाका हिने सरळ सेटमध्ये विजय मिळवला. तिने एकदाही सर्व्हिस गमावली नाही आणि प्रत्येक सेटमध्ये एक-एकदा ऑस्ट्रियन खेळाडू ग्रेबरची सर्व्हिस मोडून काढत दुसऱ्यांदा ऑकलंड ओपनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ओसाकाने यापूर्वी 2017 मध्ये उपांत्यपूर्व फेरीत गाठली होती.
ऑकलंड टूर्नामेंट 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर खेळली जाते. माजी यूएस ओपन चॅम्पियन एम्मा रादुकानू आणि एलिस मर्टेन्स यांनी दुखापतींमुळे माघार घेतल्याने या स्पर्धेची चमक काहीशी कमी झाली आहे.