FIDE World Blitz C’ship 2024 | ग्रँडमास्टर वैशालीची ब्लिट्झमध्ये कांस्यपदकाला गवसणी...

भारताच्या आर वैशालीने न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ (Blitz Chess) चॅम्पियनशिपच्या महिला गटात कांस्यपदक जिंकले आहे .

World Blitz Chess Championship, Chess news,

FIDE World Blitz Championship 2024 :- भारताच्या आर वैशालीने न्यूयॉर्क येथे झालेल्या जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ (Blitz Chess) चॅम्पियनशिपच्या महिला गटात कांस्यपदक जिंकले आहे आणि अशा प्रकारे कोनेरू हम्पीने येथील जागतिक जलद स्पर्धेत (Rapid Chess) विजेतेपद पटकावल्यानंतर, देशाच्या खेळाडूंनी 2024 च्या अखेरीस आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली.

वैशालीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झू जिनेरचा 2.5-1.5 ने पराभव करत विजय साकारला होता, परंतु उपांत्य फेरीत तिला चीनची अन्य एक प्रतिस्पर्धी जू वेनजुनकडून 0.5-2.5 ने  पराभव स्विकारावा लागला. या स्पर्धेत पूर्णपणे चिनी खेळाडूंचे वर्चस्व राहिले. चीनच्या झू वेनजुनने देशबांधव लेई टिंगजीचा 3.5-2.5 असा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले.

पाच वेळा विश्वविजेता आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) चे उपाध्यक्ष विश्वनाथन आनंद यांनी वैशालीचे तिच्या यशाबदल अभिनंदन केले आणि एकप्रकारे वर्षाचा शेवट चांगला झाला असे त्यांनी म्हटले आहे.

'खुल्या' गटात विजेतेपदाची विभागणी ...

'खुल्या' गटात, जागतिक क्रमवारीत अव्वल मॅग्नस कार्लसन आणि रशियाचा इयान नेपोम्नियाच्ची यांनी ब्लिट्झ विजेतेपद सामायिक केले कारण तीन सडन-डेथ गेमनंतर कोणताही स्पष्ट विजेता मिळाला नाही. दोन खेळाडूंमध्ये विजेतेपदाची विभागणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Share this story

Latest