Team india
India vs Australia 5th test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियासाठी आता हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे झाले आहे. या सामन्यात टीम इंडिया आपल्या सर्वोत्तम खेळासह उतरू इच्छित आहे, पण असं असतानाच सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप सिडनी कसोटीतून बाहेर पडला आहे. ज्याची माहिती स्वत: मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वास्तविक, वेगवान गोलंदाज आकाश दीप पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे त्याला सिडनी कसोटीतून बाहेर राहावे लागणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत आकाश दीपच्या दुखापतीबाबत माहिती दिली. दरम्यान, आकाश दीपने गाबा कसोटीत फलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी केली होती. या सामन्यात जसप्रीत बुमराहसह आकाश दीपने टीम इंडियाला फॉलोऑनपासून वाचवले होते. आकाश दीपने गाबा कसोटीत 31 धावांची महत्वपूर्ण खेळी खेळली होती.
2 सामन्यात घेतले 5 बळी....
आकाश दीप पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळत आहे. तिसऱ्या सामन्यासाठी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला होता. आत्तापर्यंत आकाशला फक्त दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असून त्यानं गोलंदाजी करताना 5 बळी घेतले आहेत. आकाशला गाबा कसोटीत 3 तर मेलबर्नमध्ये फक्त 2 बळी घेण्यात यश आले होते. यादरम्यान गोलंदाजी करताना इतर गोलंदाजाच्या तुलनेत आकाश थोडा महागडा ठरला आहे.
🚨 AKASHDEEP RULED OUT OF THE SYDNEY TEST MATCH...!!! 🚨 pic.twitter.com/GRsmF4jyT8
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 2, 2025
कोणाला मिळणार संधी ?
आता मोठा प्रश्न असा आहे की, आकाश दीप बाहेर झाल्यानंतर सिडनी कसोटीत त्याच्या जागी कोण येणार? मात्र, टीम इंडियाकडे प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्या रूपाने दोन उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. आता सिडनी कसोटीत कोणता खेळाडू खेळताना दिसणार हे पाहणे बाकी आहे. हर्षित राणा पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळताना दिसला होता. दुसऱ्या सामन्यातील त्याची कामगिरी निराशजनक झाली होती, त्यामुळे त्याला वगळण्यात आले होते.