IND vs AUS 5th Test | सिडनी कसोटीसाठी ऋषभ पंतचा संघातून होऊ शकतो पत्ता कट, समोर आलं मोठं कारण....

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सिडनी कसोटीतून वगळले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 1 Jan 2025
  • 01:37 pm
Sport news, Cricket news,  IND vs AUS,

Rishabh Pant (File Pic)

India vs Australia 5th Test 2025 :  बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे. मेलबर्न कसोटीतील दारुण पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत पिछाडीवर पडताना दिसत आहे. आता सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही काही बदल पाहायला मिळू शकतात. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सिडनी कसोटीतून वगळले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत.

पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार?

ऋषभ पंतची या मालिकेत आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झालेली नाही. अनेक प्रसंगी संघाला पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, त्यावेळी या खेळाडूने खराब फटका मारत आपली विकेट गमावली. यामुळे संघाची आणि चाहत्यांची निराशा झाली. पंतने मेलबर्न कसोटीत असेच काही केले आणि त्याची विकेट ट्रॅव्हिस हेडला दिली. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पंतवर नाराजी व्यक्त केली होती, कारण पंत बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.

या मालिकेत आतापर्यंत पंतने चार सामन्यांत केवळ 154 धावा केल्या आहेत. या काळात पंतची सरासरी केवळ 22 इतकी राहिली आहे. आतापर्यंत या मालिकेत पंतच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकलेले नाही. अशा स्थितीत या खेळाडूला सिडनी कसोटीतून वगळले जाण्याची शक्यता आहे, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

ध्रुव जुरेलला मिळू शकते संधी ...

यष्टिरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलची देखील बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे, मात्र आतापर्यंत जुरेलला फक्त एकाच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. जुरेल पर्थ कसोटीत खेळताना दिसला, त्याने पहिल्या डावात 11 धावा आणि दुसऱ्या डावात फक्त 1 धाव काढली. मात्र, त्याआधी भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यात झालेल्या सामन्यात त्याची कामगिरी चांगली झाली होती. ज्यामध्ये त्याने 80 आणि 68 धावांची इनिंग खेळली. आता पंतला सिडनी कसोटीतून वगळल्यास ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.

 

Share this story

Latest