Gautam Gambhir's press conference
Gautam Gambhir's press conference | भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील पाचवा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगणार आहे. चौथा कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियापुढे हा सामना जिंकण्याचे मोठे आव्हान आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाची डोकेदुखी वाढली असून संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज सामन्यातून बाहेर राहिला आहे. तसेच कर्णधार रोहित शर्माही या सामन्यात खेळणार नसल्याचे सूचक संकेत प्रशिक्षक गौतम गंभीरने दिले आहेत.
🗣️ We've got players who can achieve unbelievable things#TeamIndia Head Coach Gautam Gambhir ahead of the Sydney Test#AUSvIND | @GautamGambhir pic.twitter.com/eqJaMOujfe
— BCCI (@BCCI) January 2, 2025
वेगवान गोलंदाज आकाशदीप पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. यामुळेच त्याला शेवटच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. मेलबर्न कसोटीत त्याने एकूण ४३ षटके टाकली. ज्यात त्याला केवळ दोन विकेट घेता आल्या. दुसरीकडे मेलबर्न कसोटीत लोकांना रिषभ पंतकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, मात्र त्याने अनेक खराब शॉट्स खेळून विकेट गमावल्या होत्या. पण इथेही त्याच्या निष्काळजीपणामुळे तो बाहेर पडला. ज्यानंतर पंतला संघाबाहेर जावे लागणार असल्याची चर्चा आहे.
संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने संघ मोठ्या संकटात असताना त्याने असे वाईट शॉट्स का निवडले? असे म्हणत नाराजी दर्शवली आहे. त्यामुळे पंतला बाहेर काढून त्याच्या जागी ध्रुव जुरेलचा संघात समावेश झाल्याची चर्चा आहे. कर्णधार रोहित शर्मालाही संघातून वगळणार असल्याचे संकेत गौतम गंभीरने दिले आहेत.
गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याला रोहितच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने रोहित शर्मासोबत सर्व काही ठीक आहे. मुख्य प्रशिक्षक तुमच्यासमोर आहे, तुम्ही त्याच्यावर समाधानी राहा. आम्ही पुन्हा एकदा खेळपट्टीची पाहणी करू आणि त्यानंतरच प्लेइंग इलेव्हनवर निर्णय घेऊ, असे त्याने स्पष्ट केले.