'हिटमॅन'ने ओलांडला ६ हजार धावांचा टप्पा
#हैद्राबाद
मुंबई इंडियन्सचा कर्णधार 'हिटमॅन' रोहित शर्माने सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी करून त्याच्या आयपीएल कारकिर्दीत ६ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. या कामगिरीनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर या फलंदाजांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात आयपीएल २०२३ मधील २५ वा सामना पार पडला.
या सामन्यात सनरायझर्स हैद्राबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यामुळे मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.
आयपीएल २०२३ मधील २५ व्या सामन्यात रोहित शर्माने १८ बॉलमध्ये २८ धावांची खेळी केली. यासह त्याने आयपीएलमध्ये ६ हजार धावा करण्याचा टप्पा ओलांडला.
आयपीएल कारकिर्दीत रोहितने केवळ २३२ सामन्यांत ६ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी विराट कोहलीने १८८ सामन्यांमध्ये ६ हजार धावा केल्या होत्या. तर डेव्हिड वॉर्नरने केवळ १६५ सामन्यांत ६ हजार धावांचा टप्पा ओलांडत आयपीएलमध्ये सर्वात जलद ६ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला तब्बल ५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
वृत्तसंस्था