विनेश फोगाटचा पदक विजेत्यासारखा सन्मान करणार, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांची घोषणा

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेश फोगाट हीच्या बाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या विषयी त्यांनी माहिती दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 8 Aug 2024
  • 11:19 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी विनेश फोगाट हीच्या बाबतीत एक मोठी घोषणा केली आहे. एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर या विषयी त्यांनी माहिती दिली. आपल्या पोस्ट मध्ये मुख्यमंत्री सैनी म्हणाले की, हरियाणाची बहादुर मुलगी विनेश फोगट हिने चमकदार कामगिरी करत ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. काही कारणांमुळे ती ऑलिम्पिक फायनल खेळू शकली नसली तरी ती आपल्या सर्वांसाठी चॅम्पियन आहे. आमच्या सरकारने ठरवले आहे की विनेश फोगटचे एखाद्या पदक विजेत्याप्रमाणे स्वागत केले जाईल, तसेच ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्याला दिले जाणारे सर्व सन्मान, बक्षिसे आणि सुविधा विनेश फोगटला कृतज्ञतापूर्वक दिल्या जातील. विनेश, आम्हाला तुझा अभिमान आहे ! 

दरम्यान, अंतिम फेरीत धडक मारण्यात अपयशी ठरलेली भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगाटने कुस्ती मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विनेश फोगाट हीच वजन १०० ग्रॅमने वाढल्याने तिला ऑलिम्पिक मधून बाद करण्यात आलं. संपूर्ण देशातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचं बघायला मिळालं. एक भावनिक पोस्ट लिहून तिने कुस्तीला अलविदा केलं आहे.

विनेशने आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय,  आई कुस्ती जिंकली, मी हरले, माफ कर! तुझं स्वप्न आणि माझी हिंमत संपली. आता लढण्याची ताकद उरली नाही. अलविदा कुस्ती २००१ -२०२४. मी तुम्हा सर्वांची सदैव ऋणी राहीन.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story