गुजरात पात्र, हैदराबाद बाहेर
#अहमदाबाद
आयपीएलच्या या हंगामात ६२ लीग सामने संपल्यानंतर गुजरात टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरलेला पहिला संघ ठरला आहे. गुजरात टायटन्सने सोमवारी (दि. १५) सनरायझर्स हैदराबादचा १९ धावांनी पराभव केला. या विजयासह टायटन्स प्लेऑफसाठी पात्र ठरले, तर हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.
प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा हैदराबाद हा दिल्ली कॅपिटल्सनंतरचा दुसरा संघ ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स यांच्यात मंगळवारी (दि. १६) रंगणारा सामना महत्वाचा आहे. यात विजय मिळवल्यास चेन्नई सुपर किंग्जला मागे टाकून दुसऱ्या स्थानावर येण्याची संधी मुंबईला असेल. प्लेऑफच्या चारपैकी तीन संघ अद्याप निश्चित व्हायचे आहेत. यासाठी मुंबई, चेन्नई, लखनौ, बंगलोर, राजस्थान आणि कोलकाता या संघांमध्ये शर्यत आहे.
साखळी सामन्यात १६ किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणारा संघ पात्र ठरेल. त्याच वेळी, १४ पेक्षा कमी गुण मिळवणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. लीग टप्प्याच्या शेवटी एक किंवा दोन संघ १६ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरतील, परंतु यासाठी त्यांना त्यांचा रनरेट उर्वरित संघांपेक्षा चांगला ठेवावा लागेल. हैदराबादला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केल्यानंतर गुजरातने १३ सामन्यांत ९ विजय आणि ४ पराभव अशा कामगिरीसह १८ गुण मिळवित प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुजरातला २१ मे रोजी बंगळुरूमध्ये आरसीबीविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे.
लखननौला संधी
लखननौ संघ सध्या १२ सामन्यांत ६ विजय, ५ पराभवासह १३ गुण घेत गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. मुंबईविरुद्ध विजय मिळवल्यास हा संघ दुसऱ्या स्थानी वर येऊ शकतो. रनरेट चुन्नईपेक्षा कमी असल्यास ते तिसऱ्या स्थानावर येतील. मुंबईनंतर या संघाचा कोलकात्याविरुद्ध एक सामना बाकी आहे. हा सामना जिंकल्यास संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. एक सामना गमावला तरी या संघाला प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. त्याचवेळी दोन्ही सामने गमावल्यास संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.
थेट पात्रतेसाठी चेन्नईला विजय आवश्यक
चेन्नई सुपर किंग्जचा चौथा संघ गुणतालिकेत १५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाने १३ पैकी ७ सामने जिंकले या संघाचा दिल्लीविरुद्ध एक सामना बाकी आहे. हे जिंकल्यानंतर संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. त्याचबरोबर पराभव पत्करूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघाला उर्वरित सामन्यांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. दिल्ली संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पंजाब आणि चेन्नईविरुद्ध त्यांचे सामने बाकी आहेत. हे सामने दिल्लीने जिंकल्यास पंजाब आणि चेन्नई अडचणीत येऊ शकतात.
बंजाब, बंगलोर यांची स्थिती समान
पंजाब आणि बंगलोर यांचीही सारखीच स्थिती आहे. दोघांनीही १२ सामन्यांत ६ िवजयांसह १२ गुण मिळवले आहेत. उत्तम धावगतीमुळे बंगलोर पाचव्या तर पंजाब आठव्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून आहेत.