Gabbar : गब्बर पुन्हा पडलाय प्रेमात!

जागतिक क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ या नावने प्रसिद्ध असलेल्या शिखरचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चाहते त्याला ‘‘तू लग्न कधी करणार?’’ असे विचारत आहेत. त्याला उत्तर देताना शिखर म्हणतो, ‘‘माझ्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला असून मी एक कमिटेड नात्यात आहे. या नात्यामुळे मी खूप खूश आहे. जुन्या गोष्टी विसरून पुन्हा पुढे जायचे आहे.’’

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 12 Apr 2023
  • 02:52 am
गब्बर पुन्हा पडलाय प्रेमात!

गब्बर पुन्हा पडलाय प्रेमात!

पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने दिली कबुली

#नवी दिल्ली

जागतिक क्रिकेटमध्ये ‘गब्बर’ या नावने प्रसिद्ध असलेल्या शिखरचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात चाहते त्याला ‘‘तू लग्न कधी करणार?’’ असे विचारत आहेत. त्याला उत्तर देताना शिखर म्हणतो, ‘‘माझ्या आयुष्यात प्रेमाने प्रवेश केला असून मी एक कमिटेड नात्यात आहे.  या नात्यामुळे मी खूप खूश आहे. जुन्या गोष्टी विसरून पुन्हा पुढे जायचे आहे.’’

खुद्द शिखरनेच दिलेल्या या कबुलीजबाबावरून तो पुन्हा प्रेमात पडल्याचे दिसून येत आहे. शिखरने २०२० मध्ये आपली पहिली पत्नी आयशापासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. दोघांमधील घटस्फोटाचा खटला अजूनही सुरू आहे. अलीकडेच एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत शिखरने आयशा मुखर्जीकडून घटस्फोटावर विचारलेल्या प्रश्नावर म्हटले होते की, ‘‘लग्न मोडण्यात चूक झाली होती. घटस्फोटाचा मुद्दा अजूनही न्यायालयात आहे. लग्न यशस्वी झाले नाही, यामध्ये फेल झालो.’’ आता पुन्हा लग्न केले तर माझ्याकडे याचा जास्त अनुभव असेल, असे तो म्हणाला होता.

पंजाब किंग्जने शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकले आहेत. एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब संघ दोन सामने जिंकून गुणतालिकेत  सध्या सहाव्या स्थानावर आहे. पंजाबशिवाय राजस्थान, चेन्नई, लखनऊ आणि कोलकाता यांनीही प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. त्याचेही प्रत्येकी चार गुण आहेत. रनरेटमुळे हे संघ पॉइंट टेबलमध्ये पंजाबपेक्षा पुढे आहेत.

सध्या ऑरेंज कॅप शिखरकडे

शिखर धवन आयपीएलच्या या मोसमात धावा करण्यात सध्या अव्वल स्थानावर आहे. त्याने तीन सामन्यांत २२५ च्या सरासरीने २२५ धावा फटकावल्या आहेत.  तो दोनदा नाबाद राहिला आहे. त्याचबरोबर दोन अर्धशतकेही त्याने  झळकावली  आहेत. १८९ धावांसह ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story