भारताचे माजी कसोटीपटू सलीम दुर्रानी यांचे निधन
#नवी दिल्ली
भारताचे माजी कसोटीपटू सलीम दुर्रानी यांचे रविवारी (दि. २) सकाळी जामनगर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
अष्टपैलू खेळाडू असलेल्या दुर्रानी यांनी २९ कसोटीत १२०२ धावा केल्या आणि ७५ बळी घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दुर्रानी यांच्या नावावर १७० सामन्यांमध्ये ८,५४५ धावा आणि ४८४ बळींची नोंद आहे. सलीम दुर्रानी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३४ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झाला. नंतर दुर्रानी यांचे कुटुंब कराचीत स्थायिक झाले. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी दुर्रानी यांचे कुटुंब भारतात स्थायिक झाले होते. १९६१-६२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान. सलीम दुर्रानी हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले क्रिकेटपटू होते. सलीम दुर्रानी यांनी भारतासाठी शेवटचा कसोटी सामना फेब्रुवारी १९७३ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतही हात आजमावला. दुर्रानी यांनी 'चरित्र' या हिंदी चित्रपटात काम केले होते.वृत्तसंस्था