विराटशी पंगा महागात, नवीन उल हक संघाबाहेर?
#लखनौ
राॅयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील दिग्गज खेळाडूंनी विराट कोहलीशी पंगा घेतल्याचा मोठा फटका लखनौ सुपरजायन्ट्सच्या नवीन उल हकला बसल्याचे बोलले जात आहे. यामुळे तसेच स्टार खेळाडू परतल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आल्याची चर्चा आहे.
दक्षिण आफ्रिकेचा ओपनर क्विंटन डीकॉकची यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा पूर्ण झाली. रविवारी (दि. ७) तो लखनौतर्फे गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला.
डीकॉक संघात आल्याने नवीन उल हकला प्लेइंग इलेव्हनमधून आपलं स्थान गमवावं लागलं. लखनौचा नियमित कॅप्टन केएल राहुल दुखापतीमुळे या सीजनमध्ये खेळणार नाही. त्याच्या जागी डिकॉक ओपनिंगला आला. त्याने ७० धावांची दणकेबाज खेळी केली.
डिकॉक मागच्या सीझनमध्ये टीममध्ये होता. तो प्रत्येक सामना खेळला. त्याच्या बॅटिंगच्या बळावर लखनौची टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. मागच्या सीझनमध्ये डिकॉकने १५ सामन्यांत ५०८ धावा केल्या होत्या. त्यात ३ अर्धशतके आणि एका शतकाचा समावेश होता.
लखनौ संघात डिकॉकच्या समावेशानंतर नवीनला राखीव खेळाडूंमध्येसुद्धा स्थान दिलेले नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्धच्या सामन्यात नवीन उल हकने विराट कोहलीशी पंगा घेतला होता. या मॅचमध्ये विराट आणि नवीनमध्ये बरीच शाब्दिक बाचाबाची झाली होती. मॅचनंतर हात मिळवताना दोघे भिडले होते. त्यानंतर लखनौचा मेंटॉर गौतम गंभीरनेसुद्धा विराटसोबत वाद घातला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयपीएल व्यवस्थापनाने तिघांना दंड ठोठावला.
नवीन उल हकला बाहेर का बसवलं, याचे उत्तर द्यायचे लखनौचा कर्णधार कृणाल पंड्याने टाळले. या सीझनमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा नियम आहे. पहिली बॅटिंग करणाऱ्या टीम अतिरिक्त फलंदाज घेऊन खेळतात. गोलंदाजीच्या वेळी गोलंदाजाला संधी देतात. यासाठी चार राखीव खेळाडूंची निवड केली जाते. पण नवीनचे नाव या लिस्टमध्ये नाहीय. त्यामुळे नवीन या मॅचमध्ये खेळताना दिसणार नाही. या लिस्टमध्ये डॅनियल सॅम्सच नाव आहे. राखीव खेळाडूंमध्ये सॅम्सच्या जागी नवीनला ठेवू शकत होते. कारण दोघेही परदेशी खेळाडू आहेत. विराटसोबतच्या वादामुळे त्याचे नाव राखीव खेळाडूंच्या यादीतूनही काढल्याचे बोलले जात आहे.
वृत्तसंस्था