MSD : धोनीचा अखेरचा आयपीएल सामना १४ मे रोजी?

आयपीएलच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी १४ मे रोजी आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 24 Apr 2023
  • 03:51 pm
धोनीचा अखेरचा आयपीएल सामना १४ मे रोजी?

धोनीचा अखेरचा आयपीएल सामना १४ मे रोजी?

#चेन्नई

आयपीएलच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक असलेला चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी १४ मे रोजी आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

‘‘आता मी वृद्ध झालो आहे. यामुळे माझ्या क्रिकेट करिअरमधील हा शेवटचा टप्पा आहे. आता खेळतानाही थकवा जाणवतो. थांबण्याची योग्य वेळ आली आहे. लवकरच याबाबतचा निर्णय घेणार आहे,’’ असे म्हणत खुद्द धोनीने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व सोडण्याबरोबरच आयपीएलमधूनही निवृत्तीचे संकेत दिले.

कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाची आयपीएलमधील कामगिरी लक्षवेधी ठरली. संघाने चार वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. धोनी १४ मे रोजी आयपीएलमधील आपला शेवटचा सामना खेळण्याची शक्यता आहे. चेन्नईमध्येच दोन प्लेऑफ सामने होणार आहेत. चेन्नईला प्लेऑफ प्रवेशाची संधी आहे. यामुळे धोनीची निवृत्तीही लांबणीवर पडू शकते. त्यासाठी चेन्नई संघाला आगामी सामन्यांदरम्यान दर्जेदार कामगिरी करावी लागणार आहे.

ऋतुराज कर्णधारपदाच्या शर्यतीत

चेन्नई संघाने  ४१ वर्षीय धोनीच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर हैदराबाद सनरायझर्सविरुद्ध विजय मिळवला. या विजयानंतर धोनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. धोनीनंतर पुण्याचा युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे नेतृत्व करण्याची संधी आहे. मात्र, रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा बेन स्टोक्सदेखील कर्णधारपदाच्या शर्यतीत आहेत.  गत सत्रात जडेजाकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र, काही प्रमाणात वितुष्ट निर्माण झाल्याने जडेजाला कर्णधारपद सोडावे लागले. यामुळे आता स्टोक्स आणि ऋतुराज हे दोघेच नेतृत्वासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest