जिंकता येईना अन् म्हणे खेळपट्टी कोरडटी...

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडताना भारताने खेळपट्टी लपवली असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Fri, 17 Feb 2023
  • 06:30 pm
जिंकता येईना अन्  म्हणे खेळपट्टी कोरडटी...

जिंकता येईना अन् म्हणे खेळपट्टी कोरडटी...

ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांकडून पराभवाचे खापर खेळपट्टीवर; म्हणे भारताने लपवली माहिती!

#नवी दिल्ली

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या चार सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला एक डाव आणि १३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडताना भारताने खेळपट्टी लपवली असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनी केला आहे.

मालिकेतील दुसरा सामना दिल्लीस्थित अरुण जेटली स्टेडियमवर शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) सुरू होईल. मात्र दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत पुन्हा वाद सुरू झाला आहे. खेळपट्टी लपवल्याचा आरोप टीम इंडियावर होत आहे. खरेतर, स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने ऑस्ट्रेलियन मीडियाला खेळपट्टीची छायाचित्रे घेण्यास मनाई करण्याचा प्रयत्न केला. याच खेळपट्टीवर शुक्रवारपासून दोन्ही देशांमधील कसोटी सामना खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडियमच्या खेळपट्टीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांनी खेळपट्टी वाचण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ग्राउंडस्टाफच्या सदस्याने फोटो काढण्यासाठी पत्रकारांनी किमान ३० मीटर अंतरावर असावे असे आदेश दिले, त्यानंतर एका रिपोर्टरला सीमेवर जाण्यास सांगण्यात आले. जिथे त्याला फोटो काढण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला संधी मिळणार नसल्याची चर्चा होती, मात्र त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स याने तो खेळणार असल्याचे सांगितले आहे.

दिल्लीची खेळपट्टी स्पिनर्सना अनुकूल

ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द एज’चे पत्रकार अँड्र्यू वू खेळपट्टीची छायाचित्रे घेण्यात यशस्वी ठरले. ऑस्ट्रेलियन संघाच्या प्रशिक्षणादरम्यान त्याने गोलंदाजाच्या हातामागून फोटो क्लिक केला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क म्हणाला की, खेळपट्टी खूप कोरडी आहे. ही खेळपट्टी नागपूरसारखी असू शकते, असे बोलले जात आहे. खेळपट्टीविषयी निश्चित काही बोलता येणार नाही. ही खेळपट्टी पूर्णपणे वेगळ्या मातीची आहे. पण त्याला आशा आहे की, इथेही नागपूरप्रमाणेच परिस्थिती असेल. या ठिकाणीही चेंडू स्पिन होण्याची शक्यता असल्याचे कर्णधार कमिन्स म्हणाला. नागपूर कसोटीपूर्वी जेव्हा खेळपट्टीचे चित्र समोर आले तेव्हा त्यावेळी बराच गदारोळ झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंवर खेळपट्टीशी छेडछाड केल्याचा आरोप. त्यामुळेच खेळपट्टीचा वाद अधिक गडद झाला. आता दिल्लीच्या खेळपट्टीवरही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

वृत्तसंंस्था

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest