Benzema in the 'nineties'! : बेंझेमा ‘नव्वदी’त !

फ्रान्सचा स्टार खेळाडू करीम बेंझेमा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेस दुखापतीमुळे मुकला होता. मात्र, त्यातून सावरल्यानंतर ३५ वर्षीय बेंझेमाने गोलचा धडाका पूर्वीप्रमाणे कायम राखला आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने रेयाल माद्रिदला चेल्सी क्लबविरुद्ध २-० असा विजय मिळवून दिला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 15 Apr 2023
  • 08:04 am
बेंझेमा ‘नव्वदी’त !

बेंझेमा ‘नव्वदी’त !

फ्रान्सचा स्टार खेळाडू करीम बेंझेमा विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेस दुखापतीमुळे मुकला होता. मात्र, त्यातून सावरल्यानंतर ३५ वर्षीय बेंझेमाने गोलचा धडाका पूर्वीप्रमाणे कायम राखला आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात त्याने रेयाल माद्रिदला चेल्सी क्लबविरुद्ध २-० असा विजय मिळवून दिला. या सामन्यातील पहिला गोल बेंझेमाने २१व्या मिनिटाला तर दुसरा गोल असेन्सियाने ७४व्या मिनिटाला केला. याबरोबरच बेंझेमाने चॅम्पियन्स लीगमध्ये आपल्या नावावर ९० गोलची नोंद केली. असा पराक्रम करणारा स्पर्धेतच्या इतिहासातील तो केवळ चौथाच खेळाडू ठरला. यापूर्वी ख्रिस्तियानो रोनाल्डो (१४०), लिओनेल मेसी (१२९) आणि लेवंडोवस्की (९१) यांनी ही कामगिरी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest