भारताला संधी मिळाल्यास २०३६चे ऑलिम्पिक अहमदाबादमध्ये

अहमदाबाद : भारताने २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपली दावेदारी सादर केली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला (आयओसी) पत्र लिहिले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती बांधली जाणार सहा क्रीडा संकुले, तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प राबवणार

अहमदाबाद : भारताने २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपली दावेदारी सादर केली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला (आयओसी) पत्र लिहिले आहे. जर भारताची बोली यशस्वी ठरलज्यास गुजरातमधील शहर अहमदाबादला २०३६च्या ऑलिम्पिकचे यजमानपद मिळेल.

भारत प्रथमच ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणार असल्याने हा ऐतिहासिक प्रसंग असेल. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमभोवती सहा क्रीडा संकुल बांधले जाणार आहेत. यासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा प्रकल्प राबवला जाऊ शकतो. तशी तयारी केंद्र सरकारने केलेली आहे.  

ऑलिम्पिकसाठी ४,६०० कोटी रुपये खर्चून २१५ एकरांवर सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह बांधले जात आहे, जे ऑलिम्पिकचे मुख्य केंद्रबिंदू असेल. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा होणार असल्याचे गुजरात सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

२०३६ च्या गरजा आणि लोकांची क्षमता लक्षात घेऊन क्रीडा संकुलाचे नियोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय आणि पर्यावरणीय मानकांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

केंद्र सरकार गुजरातमध्ये ऑलिम्पिक सर्किटही तयार करत आहे. सर्वप्रथम, मणिपूर-गोधवीमध्ये भूसंपादन केल्यानंतर पाच ते सहा मोठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टेडियम आणि इतर सुविधा बांधल्या जातील. अहमदाबाद ते स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत ऑलिम्पिक सर्किट तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे. फुटबॉल, हॉकी, पोलो, स्केटिंग, बास्केटबॉल अशा दहा ते पंधरा खेळांचे आयोजन येथे केले जाणार आहे.

तिरंदाजी, रायफल नेमबाजी, भालाफेक, पॅरा ऑलिम्पिक असे सुमारे १० ते १५ ऑलिम्पिक खेळ स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या कॅम्पसमध्ये आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. अहमदाबादमधील साबरमती रिव्हरफ्रंट आणि द्वारकामधील शिवराजपूर बीचचाही ऑलिम्पिक जलक्रीडा खेळासाठी वापर करण्याचा विचार केला जात आहे. तथापि, गुजरात व्यतिरिक्त, गोवा आणि अंदमान निकोबारचे काही समुद्रकिनारेदेखील जल क्रीडासाठी चिन्हांकित केले गेले आहेत.

जगातील सर्वात मोठे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद शहरातील मोटेरा येथे आहे. नारणपुरा येथे क्रीडा संकुल बांधले जात आहे. याशिवाय अहमदाबाद आणि आसपास इतर ३० क्रीडा सुविधा आहेत. अहमदाबादला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क आहे.

असे आहे इतर स्टेडियम बांधण्याचे नियोजन
ऑलिम्पिकसाठी सहा हजार ते दहा हजार प्रेक्षकक्षमता असलेले बहुउद्देशीय मैदान तयार केले जाईल. याशिवाय पाच हजार लोकांची क्षमता असलेली रिंग ऑफ युनिटी तयार करण्यात येणार असून, तेथे गरबा, योगासने आणि उत्सव करता येणार आहेत. याठिकाणी खुली बाजारपेठही असेल.

याशिवाय आठ हजार लोकांची क्षमता असलेले बहुउद्देशीय इनडोअर रिंगण, १० हजार प्रेक्षक क्षमतेचे टेनिस सेंटर आणि जलतरणासह इतर खेळांसाठी १२ हजार लोकांची क्षमता असलेले जलचर केंद्र बांधण्यात येणार आहे. ५० हजार प्रेक्षक क्षमतेचे फुटबॉल स्टेडियमही बांधले जाणार आहे.

केंद्र सरकारने खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत नारणपुरा क्रीडा संकुलासाठी ६३१ कोटी रुपये दिले आहेत. क्रीडा संकुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ब्लॉक बी आणि डी ९० टक्के तयार आहेत. जलतरणासाठी तयार केल्या जाणाऱ्या स्टेडियमलाही आकार दिला जात आहे.

हे संकुल पहिले ऑलिम्पिक स्तरावरील क्रीडा संकुल असेल. ८२,५०७ स्क्वेअर मीटरमध्ये बांधल्या जाणाऱ्या या संकुलाचे बांधकाम मे २०२२ पासून सुरू आहे. येथे एका वेळी ३०० खेळाडू खेळू शकतात.  याशिवाय येथे ८५० कार आणि ८०० दुचाकी पार्क करता येतील.

ऑलिम्पिक आयोजनासाठी कंपनीची स्थापना
गुजरातने ऑलिम्पिकसाठी खूप आधीपासून तयारी केली होती. राज्य सरकारने गुजरात ऑलिम्पिक प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये सर्वेक्षण केले आणि जागतिक निविदाही काढल्या.

अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने शहरातील ऑलिम्पिकसाठी संकल्पना आराखडा आणि रोडमॅप तयार करण्याचे काम प्राइजवॉटर हाऊस कूपर प्रायव्हेट लिमिटेडकडे सोपवले होते. क्रीडा सुविधा, वसतिगृहे आणि हॉटेल सुविधा याशिवाय या एजन्सीने रस्ते, वाहतूक, पाणी, स्वच्छता आदींसह इतर समस्यांवर संशोधन करून सविस्तर अहवाल सादर केला आहे.

एजन्सीने अहमदाबाद-गांधीनगरमधील २२ ठिकाणे ओळखली होती, जिथे ऑलिम्पिक आयोजित केले जाऊ शकते. यापैकी सहा ठिकाणी तात्पुरत्या सुविधा उभारण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, उर्वरित साइट मोठ्या नूतनीकरणासह श्रेणी सुधारित केली जाईल.

गोधवीत ५०० एकरवर स्पोर्टस सिटी
याशिवाय अहमदाबादमधील साणंदजवळील गोधवी गावात चार वर्षात ५०० एकर मोठ्या जागेत स्पोर्टस सिटी तयार करण्यात येणार आहे. रेसिंग, जंपिंग, भालाफेक, पोहणे, जिम्नॅस्टिक, कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी, बास्केटबॉल, टेनिस, फुटबॉल, हॉकी या खेळांच्या सुविधा असतील. याशिवाय ५०० ते १००० खेळाडूंसाठी क्रीडा वसतिगृहही तयार करण्यात येणार आहे.

ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये इलेक्ट्रिक कार
ऑलिम्पिकसाठी येणारे खेळाडू आणि अधिकारी यांच्या निवासासाठी  १०  ते १५ हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. यात दोन, तीन आणि चार बेडरूमचे फ्लॅट असतील. त्याचे काम २०३२ च्या आसपास सुरू होऊ शकते. ऑलिम्पिकनंतर या फ्लॅटची विक्री केली जाईल. एका अंदाजानुसार २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी जगभरातून सुमारे १० लाख पर्यटक गुजरातमध्ये येऊ शकतात.

ऑलिम्पिक व्हिलेज पर्यावरणपूरक बनवण्यासाठी मणिपूर-गोधवीमध्ये इलेक्ट्रिक कार चालवण्याचाही विचार केला जात आहे. ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये २४ तास सतत वीज देण्यासाठी सरकार हरित ऊर्जेला प्रोत्साहन देईल. गोधवी कालव्याच्या आजूबाजूला किंवा कालव्याच्या वर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत.

ऑलिम्पिकचा खर्च गुजरातच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त
अनेक देश ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास घाबरतात कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेला धक्का बसण्याची भीती आहे. लहान देश हा धोका पत्करू शकत नाहीत. गेल्या ३० वर्षांच्या ऑलिम्पिक खेळांवर नजर टाकली तर चीनने २००८ मध्ये झालेल्या बीजिंग ऑलिम्पिकवर सर्वाधिक ४.४३ लाख कोटी रुपये खर्च केले होते.

यानंतर जपानने २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकसाठी २.९४ लाख कोटी रुपये खर्च केले. गुजरातला ऑलिम्पिक आयोजनासाठी केंद्र सरकारकडून मोठा निधी लागेल. गुजरातचे २०२४-२५ या वर्षाचे वार्षिक बजेट २.९९ लाख कोटी रुपये आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त म्हणजे गुजरातच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story