वसंत मोरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार?

वसंत मोरे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली आहे. त्यामुळे मोरे यांचा पुढील प्रवास शिवसेनेसोबत असणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Thu, 4 Jul 2024
  • 04:30 pm

वसंत मोरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार?

वसंत मोरे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांची भेट घेतली. याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून दिली आहे. त्यामुळे मोरे यांचा पुढील प्रवास शिवसेनेसोबत असणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. आगामी काळात निवडणुकीचा विचार करून वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटासोबत जावू शकतात अशी शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीआधी वसंत मोरे यांनी नाराज होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पुणे लोकसभेतून महाविकास आघाडीकडून आपल्याला तिकीट मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार, तसेच संजय राऊत यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र पुण्यातून महाविकास आघाडीने काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना यांना उमेदवारी मिळाली. त्यानंतर  मोरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आणि पुण्यातून लोकसभा लढवली. मात्र रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे दोघांनाही भाजपाच्या मुरलीधर मोहोळ यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest