खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने सोपवली मोठी जबाबदारी, एक्स पोस्ट करत दिली माहिती

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. संसदेतील मुख्य प्रतोदपदी (व्हीप) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट करत याबाबत खासदार कोल्हे यांनी माहिती दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Yogesh Sangale
  • Wed, 3 Jul 2024
  • 03:54 pm
Amol Kolhe, NCP, Sharad Pawar, Chief Whip, Ajit Pawar, Shirur LokSabha

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. संसदेतील मुख्य प्रतोदपदी (व्हीप) त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजमाध्यमांवर पोस्ट करत याबाबत खासदार कोल्हे यांनी माहिती दिली आहे. 

खासदार  अमोल कोल्हे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, "एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा कधीतरी लोकसभेत पक्षाचा उपनेता, मुख्य प्रतोद होऊ शकतो अशी कल्पनाही कोणी केली नसेल, परंतु आदरणीय पवार साहेब आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे हे शक्य झाले." 

"ही मोठी जबाबदारी आहे याची मला जाणीव आहे. ही जबाबदारी पेलण्याचं बळ माझ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे आशिर्वाद आणि शुभेच्छांमुळे मिळतेय ही माझ्यासाठी मोलाची बाब आहे."

"लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात माझ्या नावाची पाटी लागली. हा माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे. माझ्यावर हा विश्वास दर्शवल्याबद्दल आदरणीय शरदचंद्रजी पवार, खा.सुप्रियाताई सुळे आणि माझे संसदेतील सर्व सहकारी यांचे मनापासून आभार !" 

खासदार अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव करत कोल्हे यांनी शिरूर मधून दुसऱ्यांदा बाजी मारली.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नऊ खासदार आहेत. अमोल कोल्हे यांची मुख्य प्रतोदपदी म्हणजेच चीफ व्हीप पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest