राहुल गांधी व काँग्रेस दहशतवादी; रामदास आठवलेंचा आरोप

हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतः दहशतवादी असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केले आहे.

Rahul Gandhi

राहुल गांधी व काँग्रेस दहशतवादी; रामदास आठवलेंचा आरोप

जनतेला ब्लॅकमेल करून त्यांनी शतक गाठले

नवी दिल्ली : हिंदूंना दहशतवादी म्हणणारे राहुल गांधी स्वतः दहशतवादी असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी केले आहे. तसेच राहुल गांधी हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचा आरोपही आठवले यांनी केला आहे. (Rahul Gandhi)

संसदीय अधिवेशनात सोमवारपासून (१ जुलै) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा चालू आहे. दरम्यान, लोकसभेत सोमवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. तसेच ते म्हणाले, भाजप देशभर अल्पसंख्याकांविरोधात हिंसेला प्रोत्साहन देत आहे. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भाजपवाले हिंसा आणि द्वेष पसरवत आहेत, ते हिंदू असूच शकत नाहीत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मध्येच हस्तक्षेप केला. ते म्हणाले, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणून हिणवणे अत्यंत गंभीर आहे. त्यावर राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, भाजप व आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही.  राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरून भाजपा नेते, एनडीएतील (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) त्यांचे मित्र पक्ष आणि त्या पक्षांचे नेते राहुल गांधींवर टीका करू लागले आहेत.

रामदास आठवले म्हणाले, हिंदूंना दहशतवादी म्हणणे योग्य नाही. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाही मानतात आणि लोकांचाही त्यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य नाही. ते समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. त्यांनी संविधानावरून लोकसभा निवडणुकीत प्रचार केला. 

भाजपावाले ४०० पार गेले तर ते संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशा पद्धतीचा प्रचार करून त्यांनी जनतेची दिशाभूल केली, त्यांनी निवडणुकीत जनतेला ब्लॅकमेल केले,  समाजात फूट पाडली. राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत, आता ते हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम करू लागले आहेत. मला वाटते राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे आहे. मी त्या वक्तव्याचा विरोध करतो. तसेच मी म्हणेन की राहुल गांधींनी समाजात फूट पाडणे आता थांबवायला हवे.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, राहुल गांधी हिंदूंना दहशतवादी म्हणाले, भारतीय जनता पार्टीला दहशतवादी म्हणाले, परंतु राहुल गांधी हे स्वतः आणि त्यांचा काँग्रेस पक्ष दहशतवादी आहे. त्यांनी निवडणुकीत अशीच भूमिका ठेवून समाजांमध्ये फूट पाडण्याचे काम केले आहे. राहुल गांधी हिंदूंना दहशतवादी म्हणाले म्हणून तेदेखील दहशतवादी आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest