देणे-घेणे करून मत मागण्याची भूमिका नाही; अजित पवारांच्या 'कचाकच' बटण दाबण्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात प्रचार करताना 'कचाकचा' बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांच्या 'कचाकच' बटण दाबण्याच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती मतदारसंघात प्रचार करताना 'कचाकचा' बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देणे घेणे करून मते मागण्याची भूमिका आमची नसल्याचे सांगत शरद पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला. शरद पवार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सभेत कन्हेरी येथे बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, लोक काहीतरी सांगत असतात. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला वाद वाढवायचे नाही. आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही. आपल्याला मनापासून काम करायचं आहे. काल कुणीतरी सांगितलं, कसं दाबावं. मी तसं काही सांगत नाही. तुम्ही सांगताना हे सांगितलं की असं दाबलं की तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार म्हणजे मी काही याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. देणं घेणं करून वागण्याची भूमिका आमची नाही. इथं काम करायचं. लोकांना शक्ति द्यायची. लोकांची सेवा करायची आणि मत मागायची ही भूमिका असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest