आढळराव-कोल्हे यांनी एकमेकांचे धरले पाय; मतदारांमध्ये रंगली चर्चा

लोकसभेचा प्रचार सुरू झाल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहीला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे नेहमी एकमेकांवर कडवट टिका करतात.

आढळराव-कोल्हे यांनी एकमेकांचे धरले पाय

लोकसभेचा प्रचार सुरू झाल्यापासून शिरूर लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहीला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे नेहमी एकमेकांवर कडवट टिका करतात. मात्र निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेले असताना दोघांनीही एकमेकांचे पाय धरल्याने मतदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. 

खेड तालुक्यातील वाडा गावात अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने दोन्ही उमेदवार आज (२९ एप्रिल) एकाच व्यासपीठावर दिसले.  एरव्ही एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या दोन्ही उमेदवारांनी वारकरी परंपरेनुसार आज चक्क एकमेकांचे पाय धरले आणि उपस्थितांना सुखद धक्का दिला. (Lok Sabha Election 2024)

यावेळी  डॉ. कोल्हे यांनी केलेले संपूर्ण भाषण आढळराव पाटील यांनी बसून ऐकले. डॉ. कोल्हे म्हणाले, निवडणुका येतात-जातात, पद येतात जातात, पण माणूस टिकला पाहिजे. त्यासाठी वाचा शुद्धी, वर्तन शुद्धी आणि हेतू शुद्धी आवश्यक असल्याचे सांगत, महाराष्ट्राचा स्वाभिमान डोळ्यासमोर ठेऊन मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.  

कोल्हे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली मत द्यायला जाताना गॅस सिलिंडरला नमस्कार करून जा असं सांगितलं होतं. तेव्हा गॅस सिलिंडरची किंमत साडेचारशे होती. आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागेल कारण आता गॅस सिलिंडरची किंमत हजाराच्या पलीकडे गेली आहे. सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. ३७० कलम हटलं ही चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडला? त्याने गॅसच्या किमती कमी झाल्या का? त्याने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला का? त्यामुळे सर्वसामान्यांना रोजगार मिळाला का? या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असं ते म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. कोल्हे  म्हणाले, १३ मे ला आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा. कुणाला मत द्यायचं हे मी सांगणार नाही. कोणाला मत द्यायचं हे तुमचं ठरलय. परंतु वर्षभर दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करायला लागलेल्या शेतकऱ्यांची आठवण करून मतदानाला जा. भाजपच्या मंत्र्याच्या मुलाने गाडीखाली चिरडल्याने मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचा चेहरा आठवून मतदानाला जा असं आवाहन कोल्हे यांनी यावेळी केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest