हातोड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वसंत मोरेंना मिळाले 'रोड रोलर' चिन्ह

हातोड्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

हातोड्यासाठी प्रसिद्ध असलेले आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे लोकसभेचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे (Vasant More) यांना रोड रोलर हे चिन्ह देण्यात आले आहे. 

वसंत मोरे यांनी स्वत: सामाजिक माध्यमातून रोडरोलर चिन्ह मिळाल्याचे जाहीर केले.  'पुण्यात आता वसंत (तात्या) मोरे यांचा विकासाचा रोडरोलर प्रस्थापितांची झोप उडवणार...' असं लिहीत त्यांनी रोडरोलरचा फोटोही शेअर केला आहे. 

वसंत मोरे यांची मालमत्ता: 

वसंत मोरे आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण ४ कोटी १६ लाख ६७ हजार ३६४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. मोरे यांच्याकडे ७० ग्रॅम तर त्यांच्या पत्नीकडे २७० ग्रॅम सोने आहे. तसेच मोरे यांच्याकडे इनोव्हा, ऑडी आणि ॲम्बेसिडर या कार असून बुलेटसह सहा दुचाकी आहेत.तसेच त्यांच्याकडे एक ट्रकदेखील आहे. 

तसेच पुणे जिल्ह्यातील आंबवणे, चिंचळे, बोपगांव, हिरपोडी, शिंदवणे, वेळू, कासुर्डी येथे मोरे यांची शेतजमीन आहे. तसेच कात्रज येथे गाळा आणि सदनिका आहे. वसंत मोरे यांच्यावर ३ कोटी ४९ लाख २३ हजार ४३९, मोरे यांच्या पत्नीवर १८ लाख ८९ हजार, तर मोरे यांच्या मुलावर ४७ हजार १४७ रुपयांचे कर्ज आहे. वसंत मोरे यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. ही माहिती त्यांनी  प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest