धर्मावर आधारित आरक्षणाची संकल्पनाच मान्य नाही - शरद पवार

इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर ते धर्माच्या आधारावर आरक्षण देणार का? याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता यांनी भूमिका स्पष्ट केली असून धर्मावर आधारित आरक्षण मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Sharad Pawar

धर्मावर आधारित आरक्षणाची संकल्पनाच मान्य नाही - शरद पवार

इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर ते धर्माच्या आधारावर आरक्षण देणार का?  याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता यांनी भूमिका स्पष्ट केली असून धर्मावर आधारित आरक्षण मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. शरद पवार आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले ?

शरद पवार म्हणाले, धर्मावर आधारित आरक्षण ही संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. जर उद्या कुणीही असे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात उभे राहू. हे सामाजिक कटुता वाढण्याचं लक्षण असून ह्या रस्त्याने जायचंच नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. 

पवार पुढे म्हणाले, जातीवर आधारित सर्वेक्षण करण्याचा जो विचार आहे,त्याचं मुख्य कारण समाजातील गरीब वर्ग, छोटा वर्ग तो या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला आहे. त्याला  मुख्य प्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं आहे. त्यामुळे त्यांची नक्की लोकसंख्या किती आहे? कुठे आहे? या संबंधीचं वास्तव चित्र हे देशाच्या समोर आणण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो आग्रह असल्याचं पवार यांनी सांगितलं.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest