भोसरी: गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई बुधवारी (१ मे) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर लांडगे नगर येथे करण्यात आली.

Bhosari Crime News

संग्रहित छायाचित्र

भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

गांजा विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोन महिलांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई बुधवारी (१ मे) सायंकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर लांडगे नगर येथे करण्यात आली. 

पोलीस अंमलदार प्रभाकर खाडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी मधील लांडगे नगर येथे एक महिला गांजा विक्रीसाठी आली असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून ७८ हजार १०० रुपयांचा एक किलो ५७२ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. तिने हा गांजा दुसऱ्या महिलेकडून आणला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे महिलेला गांजा देणाऱ्या महिलेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest