सुप्रिया सुळे यांनी हातउसने घेतलेले ५५ लाख रुपये ५ वर्षांनंतरही केले नाही परत

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयींची घनघोर राजकीय लढाई सुरू आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत दिलेले नाहीत.

संग्रहित छायाचित्र

पार्थ, सुनेत्रा पवार यांचे सुळेंवर ५५ लाख कर्ज

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजयींची घनघोर राजकीय लढाई सुरू आहे. मात्र, सुप्रिया सुळे यांनी गेल्या पाच वर्षांपासून सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याकडून घेतलेले ५५ लाख रुपये परत दिलेले नाहीत. २०१९ च्या संपत्ती विवरणपत्रात सुळे यांनी आपण वरील दोघांकडून ५५ लाख रुपये हातउसने घेतल्याचे म्हटले होते. २०२४ मध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही हे कर्ज कायम आहे.

आपण वहिनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि भाचा पार्थ पवार (Parth Pawar) यांच्याकडून एकूण ५५ लाखांचं कर्ज घेतल्याची माहिती सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.  अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडून २२ लाख रुपयांचं कर्ज घेतले आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपयांचं कर्ज घेतले आहे. सुनेत्रा पवार यांनी केवळ सुप्रिया सुळे यांनाच नव्हे तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही ५० लाख, अजित पवार यांना ६३ लाख रुपये कर्ज दिले आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही बँकेचं कर्ज सुप्रिया सुळे यांनी घेतलेले नाही. सुप्रिया सुळे या १४२  कोटी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण आहेत. सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला यंदा शेतीतून शून्य उत्पन्न मिळाल्याचेही नमूद केलं आहे.

सुप्रिया सुळे यांच्या बँकेतील ठेवी ११ कोटी ८३ लाख, शेअर्स  १६ कोटी ४४ लाख आहेत. त्यांनी इतरांना दिलेल्या कर्जावर साडेतीन कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सुळे यांच्याकडे १ किलो ९२७ ग्रॅम म्हणजे सुमारे एक कोटी रुपयांचे सोने, ७९३ कॅरेटचे १ कोटी ५६ लाख रुपयांचे हिरे आहेत. त्यांच्या शेत जमिनीची किंमत  ५ कोटी ४५ लाख रुपये असून बिगर शेत जमीन १ कोटी ७४ लाख रुपये, निवासी प्लॉट १  कोटी ९५ लाख रुपयांचा आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest