सुनंदा पवार यांचे सूचक वक्तव्य; म्हणाल्या, शेवटच्या दोन तीन दिवसांत धनशक्तीचा वापर होणार!

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त बोलत असताना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी गुरुवारी एक सूचक विधान केलं. बारामतीच्या प्रत्येक गावात अनेक अनोळखी लोक फिरताना दिसत असून

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्त बोलत असताना आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी गुरुवारी एक सूचक विधान केलं. बारामतीच्या प्रत्येक गावात अनेक अनोळखी लोक फिरताना दिसत असून त्यापैकी काहीजण वेगळ्या भाषेत बोलत आहेत. शेवटच्या दोन तीन दिवसांत धनशक्तीचा आणि दडपशाहीचा वापर होईल, असा दावा सुनंदा पवार यांनी केला. त्या बारामती तालुक्यातील जळगाव सुपे या गावात बोलत होत्या. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फुट पडल्याचे दिसून आले. पवार कुटुंबातील अनेक सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात प्रचार करताना दिसून येत आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी सुद्धा कुटुंबातील सदस्यांना वेळोवेळी सुनावले आहे. 

बारामती लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद भावजय आमने-सामने आहेत. राजकारणासोबतच पवार कुटुंबात संघर्षही वाढला असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. 

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest