शरद पवारांचे मतदान यंदा बारामतीत; मतदानाच्या दिवशी गोविंदबागेतच थांबणार

बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या. यंदा बारामतीत अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमध्ये रंगलेल्या या सामन्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

baramati loksabha 2024

संग्रहित छायाचित्र

बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या.  यंदा बारामतीत अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमध्ये रंगलेल्या या सामन्यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. ७ मे ला (मंगळवार) बारामतीमध्ये मतदान होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

यापूर्वी शरद पवार हे मुंबईमध्ये मतदान करायचे. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपले मतदान केंद्र बारामतीमधून मुंबईला बदलून घेतले होते. यावर्षी मात्र त्यांनी बारामतीमधून मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्याने यंदा बारामतीतील सामना अटीतटीचा असल्याने शरद पवार पुन्हा बारामतीमध्ये मतदान करणार असून आपल्या गोविंदबाग येथील घरी ते दिवसभर थांबणार आहेत. तसेच माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेत ते मतदान करणार आहेत.

दरम्यान, काल बारामतीमध्ये झालेल्या सांगता सभेमध्ये शरद पवार यांना थकवा जाणवत होता. पुढील काही शरद पवार आराम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांचे पुण्यातील काही नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत. आज सकाळी शरद पवारांची प्रकृती चांगली असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest