Baramati Lok Sabha: रायरेश्वर सर्वात उंचीवरील पोलिंग बूथ !

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात उंचावरील पोलिंग बूथ म्हणून रायरेश्वर बूथ असणार आहे. 160 मतदारांसाठी हा बूथ असणार आहे. किल्ले रायरेश्वरावर राहणाऱ्या मतदारांसाठी हा स्वतंत्र पोलिंग बूथ तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

Baramati Loksabha Constituency

रायरेश्वर सर्वात उंचीवरील पोलिंग बूथ !

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात उंचावरील पोलिंग बूथ म्हणून रायरेश्वर बूथ असणार आहे. १६० मतदारांसाठी हा बूथ असणार आहे. किल्ले रायरेश्वरावर राहणाऱ्या मतदारांसाठी हा स्वतंत्र पोलिंग बूथ तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. या निवडणूकीसाठी तैनात कर्मचारी व अधिकारी ईव्हीएम, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन घेऊन रायरेश्वर किल्ल्यावर जाणार आहेत.

भोर मधील एका मतदान केंद्रावर शिडीच्या सहाय्याने चढून जावं लागणार आहे. भोर विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वात उंचीवरील (४ हजार ५०५ फुट) दुर्गम भागातील रायरेश्वर या मतदान केंद्राच्या पथकासाठी साहित्य वितरणास सुरुवात झाली असून पथकास लोखंडाच्या शिडीच्या मदतीने केंद्रावर ट्रेक करून जावे लागणार आहे.यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष बॅकपॅक सुविधा पुरवण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest