महायुतीच्या होर्डिंगवरून मावळचा उमेदवार गायब; श्रीरंग बारणे यांचा फोटो, नाव नसलेले होर्डिंग पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले!

मावळ लोकसभेचे महायुती आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे लागलेल्या नाराजी नाट्यासह धुसफुशीचे शुक्लकाष्ठ संपायचे काही नाव नाही. सुरुवातीला भाजप, राष्ट्रवादीने बारणे यांना केलेला विरोध असो, किंवा सोलापूर, बीडसह परजिल्ह्यातील मतदारांची ओढवलेली नाराजी असो,

Maval Lok Sabha Constituency

श्रीरंग बारणे यांचा फोटो, नाव नसलेले होर्डिंग पिंपरी-चिंचवडमध्ये झळकले!

श्रीरंग बारणे यांचा फोटो, नाव नसलेले होर्डिग झळकले पिंपरी-चिंचवडमध्ये

विकास शिंदे
मावळ लोकसभेचे (Maval Lok Sabha) महायुती आणि शिवसेना (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या मागे लागलेल्या नाराजी नाट्यासह धुसफुशीचे शुक्लकाष्ठ संपायचे काही नाव नाही. सुरुवातीला भाजप, राष्ट्रवादीने बारणे यांना केलेला विरोध असो, किंवा सोलापूर, बीडसह परजिल्ह्यातील मतदारांची ओढवलेली नाराजी असो, त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. त्यातच आता शहरात लागलेल्या महायुतीच्या होर्डिंगवर मावळ लोकसभा उमेदवाराचा फोटो, नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे महायुतीचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.

पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीचे होर्डिंग लागले आहेत. मात्र, त्यावर खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधातील धुसफुस कायम असल्याचे दिसून येत आहे. त्या होर्डिंगवर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीतील नेत्यांचे फोटो, शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे छापण्यात आले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच  भाजप, राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजप उमेदवाराने कमळ चिन्हावर ही निवडणूक लढवावी, यासाठी आग्रह धरला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही ही जागा राष्ट्रवादीला सोडावी, असे जाहीर विधान केले होते. 

आता शहरात महायुतीच्या प्रचारार्थ होर्डिंगवर उमेदवार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांचे फोटो, नावदेखील गायब झाले आहे. होर्डिंगवर पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व धनुष्यबाणाचाच फोटो आहे. भाजपच्या प्रचारात बारणे यांचे फोटो फक्त होर्डिंगमध्येच नाही तर रिक्षाच्या पाठीमागचे बॅनर, प्रचाराची वाहने, फलकावरूनही गायब आहेत. त्यामुळे भाजपमधील जगताप यांचे कट्टर समर्थक बारणे यांचा प्रचार करणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

अबकी बार श्रीरंग बारणे खासदार

पिंपरीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची जाहीर सभा झाली. या सभेत आठवले यांच्या समोर उमेदवार श्रीरंग बारणेंनी भाषण करत ‘अबकी बार मोदी सरकार... अबकी बार श्रीरंग बारणे खासदार’ असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली. बारणे यांनी अशी घोषणा केली खरी पण त्यांच्या घोषणेला विशेष असा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

‘राज्यभर महायुतीच्या सर्व ठिकाणी असा एकच समान मायना होर्डिंग्जवर घेतला आहे. भाजपचा उमेदवार असेल तेथे कमळ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार असेल तेथे घड्याळ व शिवसेनेचे उमेदवार असेल तेथे धनुष्यबाण असणार आहे. मतदार शेवटी चिन्हावरच मतदान करतात. त्यामुळे उमेदवारांचा फोटो घेतलेला नाही.’

- प्रमोद कुटे, शहर प्रवक्ते, शिवसेना (शिंदे गट) पिंपरी-चिंचवड शहर  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest