शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आहेत 'कोट्यधीश'; जाणून घ्या संपत्तीचा तपशील

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आढळराव पाटील यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे.

संग्रहित छायाचित्र

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आढळराव पाटील  यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. मागील पाच वर्षात  आढळराव पाटील यांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३९ कोटी ६८ लाख १९० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता असून त्यांनी ठिकठिकाणी गुंतवणूकही केली आहे. तसेच आढळराव हे काही वाणिज्यिक इमारती, सदनिका आणि शेतजमिनीचेही मालक आहेत. तसेच आढळराव यांनी  शिवाजी विद्यापीठातून कला शाखेच्या प्री-डिग्रीपर्यंत शिक्षण घेतले असून ते व्यवसाय, शेती आणि सामाजिक कार्य करत असल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. 

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संपत्तीचा थोडक्यात तपशील

रोख रक्कम - ६  लाख ४० हजार ६९३ रुपये

बँकांमध्ये डीपॉझीट -  ३ लाख ६९ हजार ६१६ रुपये

शेअर्समध्ये गुंतवणूक - ६  लाख ६८ हजार ४३५ रुपये

राष्ट्रीय बचत योजना, टपाल आणि जीवन विमा येथे गुंतवणूक - २  कोटी सहा लाख ७८ हजार १९७ रुपये

विविध व्यक्ती आणि संस्थांना दिलेले कर्ज - ३  कोटी ८५ लाख ८९ हजार ५४३ रुपये

शेतजमीन - चिंचोली आणि लांडेवाडी येथे (३१ लाख ९८ हजार ८३३ रुपये)

सदनिका - पवई,  एरंडवणा (पुणे), लांडेवाडी, मंचर, चिंचोडी

वाणिज्यिक इमारती - घाटकोपर, विक्रोळी,  शिवाजीनगर (पुणे)

कर्ज - १ कोटी ५१ लाख १९ हजार ७२९

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest