'आठवले' पण तरीही विसरले; महायुतीला विधानसभेतही आरपीआयचा विसर, थोडासा त्याग करण्याचे आवाहन

मुंबई : महायुतीच्या जागावाटपात आरपीआय नेते रामदास आठवले अद्यापही वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा, विधान परिषद आणि आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला रामदास ‘आठवले’च नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुंबई : महायुतीच्या जागावाटपात आरपीआय नेते रामदास आठवले अद्यापही वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा, विधान परिषद आणि आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीला रामदास ‘आठवले’च नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी किमान २ जागा तरी आम्हाला द्याव्यात, त्यासाठी थोडासा त्याग करण्याची तयारी दाखवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केले आहे.

या संदर्भात बोलताना आठवले यांनी एका बाजूला नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, तसेच धारावी किंवा चेंबूरच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बोलावे लागेल, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे सांगितले आहे. महत्त्वाचे म्हणजे, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ दोन दिवसच शिल्लक उरले आहेत. आठवले म्हणाले, मी नुकतेच देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आहे. त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एक तर रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी, त्याचा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तसेच, रिपब्लिकन पक्षाला १०-२० जागा द्या, अशी आमची मागणी नव्हती. चार-पाच जागा द्याव्यात, अशीच आमची मागणी होती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तिघांनाही रिपब्लिकन मतांचा फायदा होणार आहे. असे असतानाही महायुतीच्या नेत्यांनी गांभीर्याने आमचा विचार केला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आमची यादी त्यांना दिली होती आणि कोणता तरी थोडासा त्याग करणे त्यांनी आवश्यक होते. आम्ही जर एवढा त्याग करत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास होतो आहे, महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचे काम चालले आहे. म्हणून महायुतीसोबत राहायला हवे, अशी आमची भूमिका आहे. आम्ही प्रामाणिकपणे महायुतीसोबत आहोत असे असतानाही आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे म्हणत रामदास आठवले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईतील एक जागा मिळणार?
रिपब्लिकन पक्षाला एक जनाधार आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी माझ्यासोबत आहे. पण आता मी देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर, त्यांच्या कोट्यातील मुंबईतली एक जागा रिपब्लिकन पक्षाला सोडू, असे त्यांनी सांगितले आहे. यानंतर आणखी एक-दोन तरी जागा मिळाव्या, असा आग्रह आम्ही त्यांच्याकडे केला आहे. त्यात धारावी किंवा चेंबूरची जी जागा आहे, ती आम्हाला देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. या संदर्भात, मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो, कारण या दोन्ही जागा त्यांच्या कोट्यातील आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, आम्ही फडणवीसांकडे दोन जागा विधानसभेच्या, एक विधान परिषद,  सरकार आल्यानंतर दोन-तीन महामंडळांची अध्यक्षपदे, तीन-चार उपाध्यक्षपदे, तसेच जिल्हा तालुक्यातील ज्या सरकारी समित्या आहेत त्यात रिपब्लिकन पक्षाला रिप्रेझेंटेशन मिळायला हवे. याशिवाय, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, त्यातही रिपब्लिकन पक्षाला काही जागा द्यायला हव्या, अशी मागणीही रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest