रणसंग्राम २०२४: सुनेत्रा पवार अजित पवारांपेक्षा श्रीमंत

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या त्यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे त्यांनी भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सुनेत्रा पवारांकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता आहे.

संग्रहित छायाचित्र

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या त्यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत असल्याचे  त्यांनी  भरलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. सुनेत्रा पवारांकडे ५८ कोटी ३९ लाख ४० हजार ७५१ रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता आहे. यात  शेतजमीन आणि इतर प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो. अजित पवारांच्या नावे ३७ कोटी १५ लाख ७० हजार ०२९ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.  

सुनेत्रा पवारांकडे एकूण स्थूल मूल्य हे १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३ रुपये  आहे. ३ लाख ३६ हजार ४५० इतकी रोख रक्कम तर २ कोटी ९७ लाख ७६ हजार १८० रुपये एवढ्या ठेवी बँकेत आहेत.  अजित पवारांच्या बँकेतील ठेवी  २ कोटी २७ लाख ६४ हजार ४५७ रुपये इतक्या आहेत. सुनेत्रा पवारांनी वेगवेगळ्या शेअर्समध्ये १५ लाख ७९  हजार ६१० इतकी रक्कम गुंतवली आहे.  बचत योजनांमध्ये ५६ लाख ७६ हजार ८७७ रुपये गुंतवले आहेत, तर ६ कोटी ५ लाख १८ हजार ११६ रुपयांचं व्याजाचे मूल्य आहे. सुनेत्रा पवारांकडे ३४ लाख ३९ हजार ५६९ रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत. त्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे. १० लाख ७०  हजारांच्या किमतीच्या गाड्या आहेत. त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि दोन ट्रेलर आहेत. सुनेत्रा पवार यांच्यावर १२ कोटी १ लाख १२ हजार ३७४  रुपयांचं कर्ज आहे. 

तर अजित पवारांवर ४ कोटी ७४ लाख ३१ हजार २३९  रुपयांचं कर्ज आहे. सुनेत्रा पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही, तर अजित पवार यांच्यावर एकूण दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.  अजित पवारांना उपमुख्यमंत्री या नात्याने शासनाकडून तीन लाख रुपये पगार, मोफत निवास आणि वैद्यकीय सुविधा आहेत. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest