रणसंग्राम २०२४: ...तरच अजित पवारांना लोकसभेत मदत

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातून (baramati loksabha 2024) आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, त्यांची वाट सोपी नसल्याचे दिसून आले आहे.

baramati loksabha 2024

संग्रहित छायाचित्र

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता यांचा इशारा, यापूर्वी पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातून (baramati loksabha 2024) आपलाच उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. मात्र, त्यांची वाट सोपी नसल्याचे दिसून आले आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांच्या कन्या अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी अजित पवार यांच्यावर  पूर्वी शब्द फिरविल्याचा आरोप करत विधानसभेत मदत करणार असाल तरच लोकसभेला मदत करू, असा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. तरीही महाविकास आघाडीच्या काळात दोघे सरकारमध्ये सोबत होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी अजित पवार यांनी आपले सहकारी दत्तात्रय भरणे यांना राज्य मंत्रिपद देऊन हर्षवर्धन पाटील यांच्याविरुध्द ताकद दिली होती. आता अजित पवार यांनी भाजपशी युती केल्याने पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील त्यांच्यासोबत आले आहेत. (Loksabha News)

या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, ‘‘आधी आम्ही महाविकास आघाडीत होतो. त्यावेळी अजित पवारांकडून तीन वेळा शब्द देऊन तो फिरवण्यात आला. आमची फसवणूक करण्यात आली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आता आम्ही महायुतीत आहोत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जे आमचे काम करतील त्यांनाच आम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करू.’’ (Latest News Pune)

इंदापूर लोकसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला  होता. आघाडीमध्ये असतानाही अजित पवार यांनी आघाडी धर्म पाळला नाही. त्यांनी आपल्याच कार्यकर्त्याला ताकद दिली, असा हर्षवर्धन पाटील यांचा आरोप होता. पवारांच्या राजकारणाला कंटाळून शेवटी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, अजित पवार यांनी भाजपशी युती केली आहे. युतीच्या धर्मानुसार ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्यालाच उमेदवारी असे सूत्र राहणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

 विधानसभा निवडणुकीत कदाचित इंदापूरच्या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, अजित पवार या जागेवर दावा करणार आहेत. परंतु, तरीही आगामी विधानसभा निवडणूक आम्ही लढणारच असे निर्धारपूर्ण वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन यांनी अलीकडे केले आहे. त्यामुळे लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार-हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत आहे. आतापर्यंत प्रत्येक लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता. आता भाजपमध्ये असल्याने त्यांना अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. मात्र, त्या बदल्यात इंदापूरमधून उमेदवारी मिळावी, अशी त्यांची भावना आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest