रणजित मोहित्यांची हकालपट्टी करा; भाजपच्या राम सातपुते यांची पक्षाच्या वरिष्ठांकडे मागणी

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राम सातपुते यांनी केली आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

निवडणुकीत पक्षांविरोधात काम केल्याचा ठेवला आरोप

सोलापूर : माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला. कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला. भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, मारहाण झाली. भाजपाने ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आमदारकी दिली, साखर कारखान्याला आर्थिक बळ दिले ,संपूर्ण ताकद दिली त्या रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजपविरोधात काम केले. पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या. त्यामुळे रणजितसिंह  मोहिते पाटील यांची भाजपमधून तत्काळ हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी राम सातपुते यांनी केली आहे.

सातपुते यांनी विधान परिषदेचे आमदार रणजित मोहिते यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सातपुते यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि माजी पालकमंत्र्यांचा मतदारसंघ राहिलेल्या माळशिरस मतदारसंघात यंदा भाजप महायुती विरुद्ध राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत रंगली होती. मात्र यात राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांनी टफ फाईट देत हे मैदान मारले. तर भाजपप्रणीत महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला समोर जावे लागले आहे. मात्र या पराभवाचे कारण पुढे करत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहे.

माळशिरस विधानसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आपला पराभव मान्य केला. मात्र यावेळेस त्यांनी पराभवाचे खापर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर फोडल्याचे दिसून आले. राम सातपुते यांनी रणजीत सिंह मोहिते पाटील यांचे विरुद्ध फेसबुक पोस्ट लिहिली असून त्यांनी भाजपविरोधात काम केले.  पैसे वाटले, त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या, अशा पद्धतीचे आरोप राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केले आहे. याशिवाय त्यांची भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे केली आहे. या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी आमदार मोहिते पाटील यांचे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही त्यांना सातपुते यांनी प्रचारात रणजितसिंह यांचा फोटो कसा वापरला असा सवाल उपस्थित केला. आमदार रणजीत सिंह सध्या भाजपमध्ये आहेत त्यांचे बंधू धैर्यशील यांच्या लोकसभेच्या प्रचारापासूनही ते अलिप्तच राहिले. या विधानसभा निवडणुकीतही ते तालुक्यात कुठे दिसले नाहीत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest