रणसंग्राम २०२४: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा झटका

मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Lok Sabha) निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी घटना समोर आली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याने

Ajit Pawar

संग्रहित छायाचित्र

लोणावळा युवक शहराध्यक्षांसह १३७ जणांचा पक्षाला राम राम!

मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Lok Sabha) निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात असताना पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवणारी घटना समोर आली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असल्याने याच नाराजीतून तब्बल १३७ जणांनी पक्षाचा राजीनामा  दिला आहे.  (Lok Sabha 2024)

लोणावळ्यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) युवक शहराध्यक्षांसह १३७ जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्षपदावर काम करत होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्षपद दुसऱ्याला दिले. पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामा दिलेल्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही राजीनामा देणारे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. २० ते २५ वर्षांपासून पक्षाच काम केलं, आम्हाला डावलून इतरांना संधी का”, असा सवाल सर्वांनी केला आहे.

  लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आलीय. त्यांना काही अनुभव नाही. असे असतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो. आता मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचे पाऊल उचलणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest