रणसंग्राम २०२४: अजितदादांचा सख्खा पुतण्या शरद पवार यांच्या गटामध्ये

पुणे: पवार कुटुंबियातील आणखी एक काका- पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे असून विशेष म्हणजे त्यांनी आपले सख्खे काका अजित पवार

संग्रहित छायाचित्र

आणखी एक काका- पुतण्या संघर्ष

पुणे: पवार कुटुंबियातील आणखी एक काका- पुतण्या संघर्ष पाहायला मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे असून विशेष म्हणजे त्यांनी आपले सख्खे काका अजित पवार यांच्याऐवजी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाला पसंती दिली आहे. बुधवारी युगेंद्र पवार यांनी शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली. यामुळे अजितदादा पवार आणि युगेंद्र पवार हे काका-पुतणे समोरासमोर उभे ठाकलेले पाहायला मिळतील. 

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचे ठरवल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. पर्यायाने पवार कुटुंबावरही याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आता अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी काकाऐवजी आजोबांना साथ देण्याचे ठरवले आहे. उद्योजक असणारे युगेंद्र पवार हे आता राजकारणात येणार असल्याची माहिती आहे. युगेंद्र पवार यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या कार्यलयाला भेट दिली. तेथल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संवाद साधला.

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र हे व्यावसायिक आहेत. शरयू फाऊंडेशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. शरयू ॲग्रो कंपनीचे ते सीईओ आहेत. या शिवाय बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे ते खजिनदार आहेत. बारामती कुस्तीगीर परिषदेचे ते अध्यक्ष आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त युगेंद्र यांनी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. तेव्हापासूनच ते शरद पवार गटात सक्रीयपणे सहभागी होतील, अशी चर्चा होती.

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये बुधवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी शरद पवारांना युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते तुमच्याकडे येताहेत, तुम्हाला काय वाटते, असे पवारांना विचारण्यात आले. यावर शरद पवारांनी मिश्कीलपणे भाष्य केले. मुळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हेच मला माहिती नव्हते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचा स्वत:चा मोठा व्यवसाय आहे.  

अजित पवार यांनी याबाबत पूर्वीच भूमिका व्यक्त केली आहे.  बारामतीच्या निवडणुकीवेळी  सगळेजण माझ्याविरोधात प्रचार करतील. तेव्हा तुम्ही मला एकटं टाकू नका. तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडफेने निर्णय घेऊ शकतो, अशी भावनिक साद अजित पवारांनी कार्यकर्त्यांना घातली होती.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) याबाबत म्हणाल्या होत्या की, युगेंद्र पवार माझाच प्रचार करणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest