Pune News : बनावट दलित उमेदवाराविरोधात राज्यभर लढा उभारणार

बगाडे म्हणाले, की सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी आमचे पत्रव्यवहार चालू आहेत. त्यांना आम्ही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी देऊ नये अशी विनंती करीत आहोत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Laxman More
  • Mon, 21 Oct 2024
  • 08:09 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

बनावट दलित उमेदवाराविरोधात राज्यभर लढा उभारणार

पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election) वारे वाहू लागले आहेत. अशातच अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघामधे (Reserve Constituency for SC) बनावट प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना देखील नेहमी प्रमाणे  राखीव मतदार संघातुन उमेदवारी देण्याची तयारी सर्वच प्रमुख पक्षांकडून होत आहे. त्याविरोधात सत्यशोधक बहुजन आघाडी सर्व दलित संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर लढा उभारणार आल्याचा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन बगाडे (Sachin Bagade) यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सत्यशोधक बहुजन आघाडीचे निलेश वाघमारे, लहुजी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश वैराळ व राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बगाडे म्हणाले, की सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी आमचे पत्रव्यवहार चालू आहेत. त्यांना आम्ही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी देऊ नये अशी विनंती करीत आहोत. बनावट जात प्रमाणपत्र घेऊन आलेल्या बनावट दलित उमेदवारांना उमेदवारी दिल्यास त्या पक्षांच्या विरोधात दलित व बहुजन समाजाने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा व  लोकसभा अशा सर्वच ठिकाणी बनावट प्रमाणपत्र काढून सत्ता व पैसा याचा वापर केला जातो. त्याआधारे तिकिट मिळवून निवडून आल्यावर बिनदीक्कतपने सत्तेचा उपभोग घेतला जातो. यामुळे अनुसूचित जातींसाठी असलेले राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest