मतसंग्राम २०२४ : परळीत भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने अजित पवार समर्थकांना पाडण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातही शरद पवारांचा परळीचे आमदार धनंजय मुंडेंवर विशेष राग आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बहिणीचा समर्थक भावाला आणणार गोत्यात?

बीड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसने अजित पवार समर्थकांना पाडण्यासाठी चंग बांधला आहे. त्यातही शरद पवारांचा परळीचे आमदार धनंजय मुंडेंवर विशेष राग आहे. धनंजय मुंडेंचे (Dhananjay Munde) समर्थक राजेश फडांना त्यांच्यासमोर पक्षाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचा शरद पवारांचा डाव आहे. त्यातच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे निष्ठावंत आणि भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना ही निवडणूक जड जाणार असल्याचे वास्तव समोर आले आहे.  

भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे. मात्र भाजपचा पारंपारिक गड असलेल्या बीड जिल्ह्यात खिंडार पडले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र मस्के यांनी आपल्या राजीनामा दिला आहे. भाजप पदाधिकारी म्हणून राजीनामा देत असल्याची फेसबुक पोस्ट टाकत त्यांनी ही घोषणा केली आहे.  राजेंद्र मस्के यांनी अचानक जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घोषणेवेळी मोठ्या संख्येने मस्के यांचे समर्थक कार्यालयात जमले होते. निवडणूक काळात नेहमी होत असलेल्या अन्यायामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने आपला पारंपारिक गड काबीज करण्यासाठी पंकजा मुंडेंना रिंगणात उतरवले होते. पण जातीय समीकरणांमुळे वारे फिरले आणि भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला.  पंकजांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन केले. तर आता धनंजय मुंडेही महायुतीसोबत जोडले गेल्याने बीडमध्ये दोन्ही बहीण-भाऊ एकत्रितपणे ताकद लावताना दिसत आहेत. पण परळीत उमेदवारी जाहीर होण्याआधीच भाजप पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने भाजपसमोर संघटनात्मक आव्हान उभे राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत यंत्रणा उभी केली. विजयासाठी कष्ट घेतले. पण दुर्दैवाने पराभवानंतर व्यक्त केलेली शंका मनाला वेदना देणारी आहे. पराभवाचे खापर एकट्या मराठा समाजावर फोडून मोकळे झाले, अशी खंत मस्के यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. बैलगाडा शर्यतीच्या आयोजनात माझा बैलगाडा विधानसभा निवडणुकीत धावणार असून त्याला बैल कुठले असतील, हे मात्र सांगता येणार नाही, असेही राजकीय बदलाचे संकेत त्यांनी दिले होते. तर आता त्यांनी थेट राजीनामा दिल्याने भाजपची डोकेदुखी आता वाढणार आहे. तर येत्या दोन-तीन दिवसांत मस्के आपली पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे मस्केंनी यावेळी सांगितले आहे. भाजपचा राजीनामा देऊन आता पुढे कोणत्या पक्षात जाणार किंवा अपक्ष बीड विधानसभा लढणार का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest