संग्रहित छायाचित्र
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर होताच अनेक वेगवान घडामोडी घडत आहे. आयाराम-गयाराम सुरु झाले आहे. महिन्याभरापूर्वी दुसऱ्या पक्षात असलेले नेते नवीन घरोबा करत आहे. येनकेनप्रकारेन आमदार व्हावे, यासाठी नाती विसरत आहेत. आता महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ चर्चेत आले आहेत. या दोन्ही मतदार संघात मुली आपल्या काका अन् वडिलांना आव्हान देणार आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघ आणि गडचिरोलीमधील अहेरी विधानसभा मतदारसंघ आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसचे धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम (Bhagyashree Atram) आमदार आहेत. त्यांच्या विरोधात त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम (Bhagyashree Atram) राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसकडून मैदानात उतरणार आहे. यामुळे यंदा या मतदार संघात बाप-लेकीची लढाई रंगणार आहे.
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा अहेरीत आली होती. तेव्हा त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार यांनी भाग्यश्री आत्राम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बापासोबतच राहा, अशी भावनिक साद घातली. परंतु भाग्यश्री आत्राम माघार घेण्याच्या तयारी नाही. त्या आता निवडणूक आखाड्यात बापाविरुद्ध उतरणार आहे. विदर्भातील गडचिरोलीमधील या घडामोडीनंतर दुसरी घटनाही विदर्भातील बुलढाण्यात घडली. माजी मंत्री आणि बुलढाण्यातील सिंदखेडराजा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला. त्यानंतर ते शरद पवार यांच्या पक्षात आले. त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या पक्षात राजेंद्र शिंगणे येताच त्यांची पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingane) नाराज झाली झाली. त्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच त्याही सिंदखेडराजा मतदारसंघातून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. यामुळे या ठिकाणी काका अन् पुतणी अशी लढत रंगणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.