मतसंग्राम २०२४ : मविआसाठी जरांगे फॅक्टर ठरणार बुमरँग?

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. त्यांच्या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले आहे. जरांगे यांच्या भूमिका सातत्याने बदलत गेल्याने त्यांचे आंदोलन समाजासाठी नसून राजकीय असल्याचे बोलले जात होते.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मतविभागणीवरच ठरणार उमेदवारांचे भवितव्य, प्रस्थापित विरुद्ध गरजवंत मराठा लढ्याची शक्यता

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभारला. त्यांच्या आंदोलनाने आता राजकीय वळण घेतले आहे. जरांगे यांच्या भूमिका सातत्याने बदलत गेल्याने त्यांचे आंदोलन समाजासाठी नसून राजकीय असल्याचे बोलले जात होते. त्यांच्या माध्यमातून शरद पवारांना राज्यात सत्ताबदल घडवून आणायचा असल्याचेही यापूर्वी अनेक अभ्यासकांनी उघडपणे बोलून दाखवलेले आहे. मात्र आता महायुतीला टार्गेट करण्यासाठी जरांगेंना पाठबळ देणाऱ्या महाविकास आघाडीवरच हे बुमरँग उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील ज्या मराठवाड्यातून येतात, तिथे लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्वच जिल्ह्यांत जरांगे यांचा प्रभाव असल्याचे सिद्ध झालेले आहे. भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना या आंदोलनाचा जोरदार फटका बसलेला आहे. जरांगे हेसुद्धा सातत्याने फडणवीसांनाच टार्गेट करताना दिसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामागे फडणवीसांचे महायुतीतील स्पर्धक अथवा शरद पवार असल्याचे बोलले जात असते.

आता विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांनी जिथे आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, तिथे उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठवाड्यातील इतर मागासवर्गीय समाज एकवटला आहे. हा समाज भाजपकडे झुकलेला असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आलेले आहे. बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे या लढतीत मराठा विरुद्ध ओबीसी अशीच लढत झालेली पाहावयास मिळाली आहे. आताही महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष उमेदवारी देताना जरांगे यांच्या संमतीचे अथवा त्यांचा आशीर्वाद असणारे उमेदवार देण्याची प्रक्रिया राबवत आहेत. अर्थात इच्छुक उमेदवारही जरांगे यांचा आशीर्वाद घेऊनच मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. म्हणूनच अंतरवाली सराटीत ८५० पेक्षा जास्त  इच्छुकांनी रांगा लावल्याचे स्पष्ट झाले आहे.                    

जरांगे यांच्या आंदोलनामुळे एकूण राज्यभरात आणि विशेषतः मराठवाड्यात प्रस्थापित मराठा विरुद्ध गरजू मराठा अशी विभागणी झालेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित आणि शरद पवार) या पक्षांनी आजवर केवळ ऐश्वर्य उपभोगणाऱ्या वर्गाचेच प्रतिनिधीत्व केलेले आहे. याउलट शिवसेनेला तरी सर्वसामान्य माणसाची सहानुभूती आहे. मनोज जरांगे भलेही उघडपणे भाजप आणि फडणवीसांना टार्गेट करत आलेले असले तरीही गरजवंत मराठा समाजाला आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कधीच थारा दिलेला नसल्याचे पक्के ठाऊक आहे. त्यामुळे हा वर्ग महाविकास आघाडीतील शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे वळेल याची शाश्वती देता येत नाही. राजकारणाच्या आवेशात मराठा आंदोलन आणि इतर आघाड्या झाल्या तर निकालात त्याचे वेगळे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. या निकालातील पहिली शक्यता म्हणजे गरजवंत मराठे प्रस्थापित मराठा नेते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाविरोधात कौल देतील. तसे घडले नाही तर मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत होण्याचीही शक्यता आहे. 

काय म्हणाले जरांगे पाटील?
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी जिथे निवडून येईल तिथे आपला उमेदवार उभा करा, अशी घोषणा केली आहे. जिथे आपले उमेदवार निवडून येणार नाहीत तिथे जो उमेदवार मराठा आरक्षणाची बाजू मांडेल असे बॉन्डवर लिहून देईल त्याला निवडून आणा. नसेल लिहून  देत तर त्याला पाडा. जिथे एस्सी एसटीचे उमेदवार आहेत तिथे उमेदवार उभे करू नका, जो उमेदवार आपल्या विचाराचा असेल तर त्याला मत देऊन निवडून आणा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest