'सोलापूर शहर मध्य' मतदारसंघासाठी मुस्लिम समाज आग्रही

सोलापूर जिल्ह्यातील शहर मध्य हा मतदारसंघ मुस्लिम समाजाला सोडण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत रोज एक नेता पत्रकार परिषद घेऊन मागणी करताना दिसत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 22 Oct 2024
  • 05:42 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लोकसभेतील योगदानाचे करून दिले जातेय स्मरण, महायुतीच्या उमेदवाराचे नाव गुदस्त्यात

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शहर मध्य हा मतदारसंघ मुस्लिम समाजाला सोडण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत रोज एक नेता पत्रकार परिषद घेऊन मागणी करताना दिसत आहेत.  तर दुसरीकडे या मतदारसंघातून एमआयएमचे फारूक शाब्दि यांची उमेदवारी यापूर्वी जाहीर झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने जर मुस्लिम उमेदवार दिला तर मतांमध्ये विभाजन होणार हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजप आणि सेनेचे नेते, पदाधिकाऱ्यांना बरे वाटत आहे हे चांगले खुश झाले आहेत.

काँग्रेस (Congress) आणि एमआयएमच्या (MIM) मतविभागणीत महायुतीची जागा निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे एमआयएमला काहीही चिंता लागून राहिलेली नाही. शहर मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेला अनेकवेळा आपला उमेदवार निवडून आणता आलेला आहे. आतापर्यंत शहर मध्य मतदारसंघावर प्रणिती शिंदे (Ptaniti Shinde) यांनी प्रतिनिधित्व केले आहे, तरी त्यामुळे या मतदारसंघातून आतापर्यंत कोणीच उमेदवारीची मागणी कधीही केली नव्हती मात्र आता आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या मतदारसंघात संधी निर्माण झाली आहे.

या मतदारसंघातून तब्बल १८ जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये मुस्लिम समाजातील माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे.  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे विजय झाल्या यावेळी एमआयएमने उमेदवार दिला नव्हता. त्याचा फायदा काँग्रेसला झाला. वास्तविक पाहता एमआयएमने उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या मात्र त्याला मुस्लिम समाजातून विरोध झाला. त्यामुळे शहराध्यक्ष फारुख शाबू यांनी समाज प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणून त्या विजयी झाल्या. आता शिंदे यांनी समाजासाठी उमेदवार द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणूक नंतर मुस्लिम समाजाने (Muslim Community) एकत्रित येऊन काँग्रेसला साथ दिली आता काँग्रेसने ही जागा मुस्लिम समाजाला सोडावी अशी मागणी आता नेत्यांनी सुरू केली आहे. याबाबत रोज समाजातील नेत्याकडून पत्रकार परिषद, गप्पा मारणे असे अनेक प्रकार घडत आहेत. काही ठिकाणी नावेही सुचवण्यात येत आहेत. त्यामुळे महायुतीचे नेते चांगलेच खुश झाले आहेत. कारण एमआयएमने फारूक शादी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अशातच काँग्रेसकडून मुस्लिम समाजाचा उमेदवार दिल्यास हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, असे गणित मांडले जात आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest