राज्यात पुन्हा तिसऱ्या आघाडीसाठी चाचपणी, प्रकाश आंबेडकरांनी दिले संकेत

मुंबई: आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहेत. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी चाचपणी करायला सुरुवात केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 5 Sep 2024
  • 03:23 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

विधानसभा निवडणुकीत मविआसोबत जाणार नसल्याचे केले स्पष्ट

मुंबई: आगामी विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. कधीही निवडणुकीची तारीख जाहीर होईल, अशी परिस्थिती आहे. त्यादृष्टीने राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहेत. अशात आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीच्या उभारणीसाठी चाचपणी करायला सुरुवात केली आहे.

प्रकाश आंबेडकर हे गेल्या दिवसांपासून वेगळी आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्नात आहेत. यापूर्वी त्यांनी छगन भुजबळ आणि माकप यांना नव्या आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. छगन भुजबळ हे शंभर टक्के ओबीसीवादी नेते आहेत आणि त्यांनी आमच्याबरोबर यावे असे आम्हाला वाटते, असे आंबेडकर म्हणाले होते. तसेच माकपबाबत बोलताना, माकपने महाराष्ट्रात आमच्याबरोबर यावे, मी केरळ किंवा पश्चिम बंगालमधल्या माकपबद्दल बोलत नाही. तर महाराष्ट्रातील माकपबद्दल बोलतो आहे. सध्या मी त्यांचा काडीमोड होण्याची वाट पाहणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली होती.

बुधवारी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान लोकसभेला काँग्रेसला पाठिंबा दिला, तसेच चित्र विधानसभेतही असेल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यासंदर्भात बोलताना, आगामी विधानसभेत आम्ही कुणालाही पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा देणार नाही. वंजित बहुजन आघाडी आणि आमच्या आघाडीतील घटक पक्षांच्या उमेदवारांनाच आम्ही पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले. तेव्हा काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. मात्र, यावेळी असे काहीही नाही. विधानसभेत आमचा कोणालाही पाठिंबा नसेल. वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्ष मिळून एकत्र निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे केवळ आमच्या उमेदवारांना आम्ही पाठिंबा देऊ, दुसऱ्या कोणालाही नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले, यांच्यासारखे राज्यातल्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात उमेदवार देणार का? असे विचारले असता, कोण मोठा आणि कोण छोटा हे जनता ठरवत असते. संबंधित मतदारसंघात जे कोणी इच्छूक उमेदवार असेल, त्यांचा अभ्यास करून आम्ही योग्य उमेदवार देऊ. तो मोठा आहे की लहान, हे आम्ही बघणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

Share this story

Latest