संग्रहित छायाचित्र
छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी माफी मागितली होती. यावर जो चूक करतो तोच माफी मागतो असं भाष्य करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली. गुरुवारी सांगली येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते.
राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी का मागितली असावी याचा मी विचार करत होतो. याचं पहिलं कारण, तो पुतळा बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला दिले गेले म्हणून त्यांनी माफी मागितली असावी. पुतळा बनवताना दुर्लक्ष झालं या कारणामुळे त्यानी माफी मागितली असावी किंवा पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला असावा म्हणून त्यांनी माफी मागितली अशी कारणे त्यांनी सांगितली. तसेच पंतप्रधानांनी फक्त शिवाजी महाराजांचीच नाही तर महाराष्ट्रातील जनतेचीही माफी मागायला हवी असं राहुल गांधी म्हणाले.
सांगली येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. हा पुतळा पुढील 50-70 वर्षे अशाच स्वरूपात आपल्याला दिसेल अशी मी गॅरंटी देतो असं गांधी म्हणाले.