संग्रहित छायाचित्र
भाजपाकडून प्रवेशा संदर्भात अद्याप कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने एकनाथ खडसे यांनी थेट भाजपाला इशारा दिला आहे. आणखी काही दिवस वाट बघेन. अन्यथा पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार ) पक्षात प्रवेश करीन असं माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते पुन्हा भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. खडसे यांनी माध्यमांना देखील आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. मात्र काही महीने उलटून गेले तरीही त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही.
या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, राष्ट्रवादीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. मात्र अद्याप तो स्वीकारलेला नाही. भाजपा प्रवेशाबाबत अजून काही दिवस वाट बघेन. अन्यथा परत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष जॉइन करेन आणि कामाला सुरुवात करेन अशा आशयाचं विधान खडसे यांनी केलंय.